Home विदर्भ ‘कॉटन किंग’ स्व. रामेश्वर पाटील यांच्या निधनाने संग्रामपूर तालुक्याचे अपरिमित नुकसान: हर्षवर्धनदादा...

‘कॉटन किंग’ स्व. रामेश्वर पाटील यांच्या निधनाने संग्रामपूर तालुक्याचे अपरिमित नुकसान: हर्षवर्धनदादा सपकाळ

काँग्रेस पक्ष शोकाकुल कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा : प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ

 

संग्रामपूर ( नंदू पाटील)

 

संग्रामपूर तालुक्यातील पंचाळा येथील प्रतिष्ठित व्यापारी, प्रख्यात ‘कॉटन किंग’, संग्रामपूर पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष स्व. रामेश्वर पाटील यांच्या निधनाने पाटील कुटुंबासह पंचाळा गाव आणि संपूर्ण संग्रामपूर तालुक्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक व व्यापारी क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून, काँग्रेस पक्ष या दुःखद प्रसंगी शोकाकुल कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, अशी भावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ यांनी व्यक्त केली.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ यांनी नुकतीच पंचाळा येथील स्व. रामेश्वर पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी स्व. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहिली. त्यानंतर स्व. पाटील यांचे सुपुत्र राजेश्वर रामेश्वर पाटील तसेच कुटुंबातील इतर सदस्यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.

स्व. रामेश्वर पाटील यांनी व्यापार, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात केलेल्या कार्याचा यावेळी उपस्थितांनी आवर्जून उल्लेख केला. सामान्य नागरिकांशी असलेला त्यांचा जिव्हाळा, सामाजिक बांधिलकी आणि सार्वजनिक जीवनातील योगदानाच्या आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला.

काँग्रेस पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

या सांत्वन भेटीप्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाशभाऊ पाटील, पक्षनेत्या स्वातीताई वाकेकर, तालुकाध्यक्ष सतीश टाकळकर यांच्यासह राजूभाऊ वानखडे, तेजराव मारोडे, प्रकाश देशमुख, संतोष राजनकर, मोहन रौंदळे, संजय ढगे, राजेश्वर देशमुख, दादा पाटील, गजानन पाटील, प्रमोद पाटील, भाऊराव भालेराव, दत्ता बोरकर, आकाश बोरसे पठाण सर अच्छे खा.हबीब खा.यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी स्व. रामेश्वर पाटील यांच्या स्मृतींना उजाळा देत पाटील कुटुंबाप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या. त्यांच्या निधनामुळे संग्रामपूर तालुक्यात शोककळा पसरली असून राजकीय, सामाजिक आणि व्यापारी क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.

‘ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती लाभो आणि शोकाकुल कुटुंबास हे असीम दुःख सहन करण्याचे सामर्थ्य देवो,’ अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Don`t copy text!