मानाच्या गणपती पूजनाने गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ
वाडेगाव :- वाडेगावात शनिवारी विविध गणेश मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेत भक्तीमय वातावरणात व पारंपारिक वाद्यांच्या निनादात गणरायाला भावपूर्ण निरोप दिला प्रथम मानाच्या गणपतीचे पुजन करुन मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला यावेळी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता
वाडेगावात प्रथम सस्ती वेशीजवळ वाडेगाव पोलीस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक विनोद खाडे, तंटामुक्ती अध्यक्ष सागर सरप, ग्रा.प. प्रशासक मंगेश तायडे, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय बोरकर, प्रकाश कंडारकर, शामलाल लोध, संजय सरप, रवि सरप, दिपक मसने,सुधिर सरप,रंजीत अहीर, मनिष सरप, दत्ता मानकर, प्रेम तायडे, अनंता काळे, चेतन कारंजकर ग्रा.प सदस्य सुनील घाटोळ, प्रशांत मानकर, अरुण हुशे, सुनिल मानकर, गणेश कंडारकर, संदीप घाटोळ , संतोष रायटे, रामजी सौंदळे दैनिक सकाळचे प्रतिनिधी संतोष काळे यांच्याहस्ते मानाच्या गणपतीचे पूजन झाल्यानंतर गणेशोत्सवाच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला गावातील प्रमुख मार्गाने निघालेल्या मिरवणुकीत अनेक मंडळांनी सहभाग दर्शविला होता. ढोल-ताशांचा गजर, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ जयघोषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते यावेळी मिरवणुकीत गणेश भक्तांनी वाद्यांच्या तालावर नृत्याचा मनमुराद आनंद घेतला गणेशोत्सवाच्या काळात शांतता सामाजिक सलोखा आणि बंधुभाव कायम ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते त्याला प्रतिसाद देत गणेश मंडळ आणि नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन केले. त्यामुळे विसर्जन मिरवणूक उत्साहपूर्ण आणि शांततेत पार पडली. गणेश विसर्जनाच्यावेळी भाविकांनी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला. यावेळी भक्तांच्या चेहऱ्यावर उत्साहासोबतच गणरायाला निरोप देतांना भावुकताही दिसून आली. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी बाळापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे व वाडेगाव पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक विनोद खाडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता मिरवणूक दरम्यान पोलीस प्रशासनाला शांतता कमिटीच्या सदस्यांचे सहकार्य लाभले.






