श्रीकांत पाचकवडे
अकोला : “स्पर्धेच्या युगात यशाचे शिखर गाठायचे असेल, तर उत्तम संवाद कौशल्य आत्मसात करा. त्यातूनच व्यक्तिमत्वाची खरी जडणघडण होते,” असे प्रतिपादन महाराष्ट्र नशाबंदी मंडळाचे जिल्हा संघटक व सर्वोदय मंडळाचे जिल्हाध्यक्ष बबनराव कानकिरड यांनी केले.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, अकोला चे वतीने बालाजी कॉन्व्हेंट मलकापुर येथेआयोजित ‘वासंतिक व्याख्यानमाला’ या गटस्तरीय कार्यक्रमात दुसरे पुष्प गुंफताना ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
“आजच्या तरुणाईने कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नये. गुटखा, तंबाखू सारखी व्यसने संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करतात. केवळ स्वतः व्यसनमुक्त राहून चालणार नाही, तर आपला परिसरही व्यसनमुक्त केला पाहिजे. त्यातूनच तुमचे व्यक्तिमत्व अधिक उठून दिसेल.”असे आग्रही प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहायक कामगार कल्याण आयुक्त सौ. वैशाली नवघरे होत्या. अध्यक्षीय मनोगतात त्या म्हणाल्या, “व्यक्तिमत्व विकासासाठी संवाद कौशल्यासोबतच वाचनाची आवडही जोपासली पाहिजे. विचार समृद्ध करण्यासाठी वाचन हाच उत्तम मार्ग आहे.”
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकृष्ण विखे पाटील, शीघ्रकवी रामराव पाटेखेडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कामगार कल्याण निरीक्षक सौ. प्रतिभा पागधुने यांनी केले. आभार प्रदर्शन स्वाती पाटेखेडे यांनी केले.
सर्वश्री भुजंगराव देशमुख, अमिष पाटेखेडे,, नम्रता सातव, ज्योती काळणे, संध्या पाटेखेडे, गजानन कडू, माणिकराव देशमुख, सविता शेळके, मुक्ता वाघमारे,सुनिता खराटे, वत्सला पाटेखेडे, गोपाल घेगाटे, भीमराव पाटेखेडे, मैथिली भालदाणे यांच्यासह कामगार, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.





