Home Breaking News प्रेमाच्या जाळ्यात ओढून उच्चशिक्षित तरुणींवर अत्याचार ; आक्षेपार्ह छायाचित्र दाखवत करायचा ब्लॅकमेल   

प्रेमाच्या जाळ्यात ओढून उच्चशिक्षित तरुणींवर अत्याचार ; आक्षेपार्ह छायाचित्र दाखवत करायचा ब्लॅकमेल   

प्रेमाच्या जाळ्यात ओढून उच्चशिक्षित तरुणींवर अत्याचार ; आक्षेपार्ह छायाचित्र दाखवत करायचा ब्लॅकमेल   

नागपूर : तब्बल एक डझन तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून युवकाने त्यांचे शारीरिक शोषण केल्याची खळबळजनक घटना कन्हान पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अत्याचारसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून युवकाला अटक केली आहे. अर्जुन राजेंद्र कनोजे (३०, रा. कामठी) असे अटक तरुणाचे नाव आहे.

रिया (काल्पनिक नाव) ही उच्चशिक्षीत तरुणी एका आयटी कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहे. पाच वर्षांपूर्वी तिला कळमेश्वरमध्ये प्लॉट खरेदी करायचा होता. यावेळी अर्जुन हा एका कंपनीसाठी प्रॉपर्टी डिलिंगचे काम करायचा. मित्राच्या माध्यमातून तिची अर्जूनसोबत ओळख झाली. अजुर्नने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. विवाहित असतानाही त्याने अविवाहित असल्याचे रियाला सांगितले. १८ डिसेंबर २०२४ ला त्याने रियाला रामटेक परिसरात ओयो हॉटेलमध्ये नेले. नंतर तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. रियाने नकार दिला, पण अर्जुनने लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केला. यावेळी त्याने रियाचे आक्षेपार्ह छायाचित्र व चित्रफित काढली. त्याआधारे तो तिला ब्लॅकमेल करायला लागला. तिच्याकडून खंडणी उकळून अर्जुनने कारही खरेदी केली.

काही दिवसांपूर्वी ती अर्जुनच्या घरी गेली असता, अर्जुन हा विवाहित असल्याचे कळाले. तिने त्याच्यासोबतचे संबंध संपुष्टात आणले. अर्जुनने रियाला छायाचित्र व चित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी दिली. रियाने त्याच्याबाबत माहिती काढली असता अर्जुनने तब्बल १२ तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे शारीरिक शोषण करून लाखो रुपयांची खंडणी उकळली असल्याचे समजले. रियाने कन्हान पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत गुन्हा दाखल करून आरोपी अर्जुनला अटक केली.

Don`t copy text!