Home Breaking News बारावी मध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांची गळफास घेवून आत्महत्या

बारावी मध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांची गळफास घेवून आत्महत्या

बारावी मध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांची गळफास घेवून आत्महत्या
चंद्रपूर : मंगळवार (दि.21) ला महाराष्ट्र राज्यात 12 वीचे निकाल जाहीर झाले. सर्वच विद्यार्थी निकाल पाहून यश प्राप्त केल्याचा आनंद साजरा करीत असताना चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील नेरी येथे एक दुर्दैवी घटना घडली. एका विद्यार्थ्यांने बारावीत कमी गुण मिळाल्याने नैराश्यात येऊन घरीच  गळफास घेवून आत्महत्या केली आहे.

आकाश पुरुषोत्तम वैरागडे (वय 18), रा. नेरी (चिमूर) असे विद्यार्थांचे नाव आहे. यामुळे नेरी गावात शोककळा पसरली आहे. चिमूर तालुक्यातील नेरी येथील आकाश पुरुषोत्तम वैरागडे हा विद्यार्थी चिमूर येथील नेहरू कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होता. बारावीची परीक्षा झाली आणि पेपरसुद्धा चांगले गेले असल्याने परीक्षेत चांगल्या गुणांनी यश संपादन करीन असा त्याचा आत्मविश्वास होता. मात्र निकाल पाहताच त्याला धक्का बसला. अभ्यास व मेहनत करूनही त्याला कमी गुण मिळाल्याने तो नैराश्यात गेला. त्याने जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेत घरात कुणीही नसतांना दरवाजा बंद करून दोराने गळफास घेऊन जीवन संपवले.या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Don`t copy text!