Home Breaking News दहिहांडा विनयभंग प्रकरणात आरोपीला दोन वर्षांचा सश्रम कारावास; ९ हजारांचा दंड

दहिहांडा विनयभंग प्रकरणात आरोपीला दोन वर्षांचा सश्रम कारावास; ९ हजारांचा दंड

अकोट न्यायालयाचा निकाल; २०२३ मधील गुन्ह्यात आरोपी दोषी

श्रीकांत पाचकवडे

अकोला : महिलेचा विनयभंग करून तिच्या घरात अनधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी अकोट येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी आरोपीला दोन वर्षे सश्रम कारावास आणि एकूण ९ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. शेषराव साहेबराव मोडक (वय ४९, रा. गोपालखेड, ता. अकोट) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. २१ ऑक्टोबर २०२६ रोजी खटला क्रमांक २५४/२०२३ मध्ये हा निकाल देण्यात आला.

 

महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० ऑगस्ट २०२३ रोजी फिर्यादी महिलेचे पती कामानिमित्त बाहेरगावी गेले होते, तर सासू-सासरे शेतात कामासाठी गेले होते. सकाळी सुमारे १०.३० वाजता महिला आपल्या मोठ्या मुलाला अंगणवाडीत सोडण्यासाठी लहान मुलाला कडेवर घेऊन गेली होती.

 

घरी परतल्यानंतर आरोपीने महिलेचा विनयभंग केला. महिलेने त्याला विरोध करत घराबाहेर जाण्यास सांगितले आणि आरडाओरड केली. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. महिलेने तत्काळ आपल्या पतीला फोन करून घडलेला प्रकार सांगितला.

 

या तक्रारीवरून दहिहांडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८१/२०२३ दाखल करण्यात आला. भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४, ३५४(अ), ३५४(ड), ४५२ आणि ३२३ अंतर्गत गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला.

Don`t copy text!