श्रीकांत पाचकवडे
अकोला : पोलीस सेवेत तब्बल ३३ वर्षे प्रामाणिकपणे आणि अखंड सेवा बजावल्यानंतर एका पोलीस अधिकाऱ्याने आपल्या सेवेला निरोप दिला. या प्रदीर्घ कारकिर्दीत संवेदनशील पोलीस ठाण्यांसह विविध महत्त्वाच्या शाखांमध्ये काम करताना पत्रकारांनी दिलेले सहकार्य, सकारात्मक प्रसिद्धी आणि विश्वास याबद्दल पोलीस उपअधीक्षक गजानन शेळके यांनी पत्रकार मित्र, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
परतवाडा, पुसद शहर, खदान, अकोट शहर, बाळापूर यांसारख्या संवेदनशील पोलीस ठाण्यांसह एकूण १२ पोलीस ठाण्यांचा ठाणेदार म्हणून गजानन शेळके यांनी यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली. याशिवाय शहर वाहतूक शाखा, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), स्थानिक गुन्हे शाखा (LCB), गुन्हे अन्वेषण विभाग (CID) आदी शाखांमध्येही त्यांनी प्रभारी म्हणून काम केले.
सामाजिक उपक्रमांना पत्रकारांची साथ
सेवाकाळात कायदा-सुव्यवस्थेसोबतच विविध सामाजिक उपक्रम आणि Community Policingवर भर देण्यात आला. ‘नो मास्क, नो सवारी’, बुलेटवरील मॉडिफाइड सायलेन्सरविरोधातील कारवाई, अकोटमधील प्रार्थनास्थळाचा प्रश्न, विविध गुन्ह्यांचा यशस्वी तपास आणि आरोपींची अटक अशा अनेक उपक्रमांना पत्रकारांनी ठळक प्रसिद्धी दिली.
या प्रसिद्धीमुळे काही उपक्रमांना राज्यस्तरावर तसेच देशपातळीवरही ओळख मिळाली, असे त्यांनी नमूद केले.
राष्ट्रपती पोलीस पदकाचा सन्मान
३३ वर्षांच्या सेवेत मिळालेल्या ‘राष्ट्रपती पोलीस पदका’चाही गजानन शेळके यांनी आवर्जून उल्लेख केला. या सन्मानाचे श्रेय वरिष्ठ अधिकारी, सहकारी कर्मचारी यांच्यासोबतच पत्रकार मित्रांनाही असल्याचे त्यांनी सांगितले.
“पत्रकारांनी चांगल्या कामाची सकारात्मक दखल घेतल्यामुळे आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळत राहिली. त्यामुळे सेवेच्या शेवटच्या दिवशी पत्रकार मित्रांचे ऋण व्यक्त करणे माझे कर्तव्य आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
‘पोलीस अधिकारी नसेन, पण मित्र कायम राहीन’
पोलीस सेवेला निरोप देताना त्यांनी भावनिक संदेशही दिला. “उद्यापासून मी पोलीस अधिकारी नसेन; मात्र आपला मित्र कायम राहीन. माझ्या Second Inning मध्येही आपले प्रेम, विश्वास आणि सहकार्य असेच कायम राहू द्या,” असे म्हणत त्यांनी सर्व पत्रकार मित्रांचे मनःपूर्वक आभार मानले. यांच्यासोबतच पत्रकार मित्रांनाही असल्याचे त्यांनी सांगितले.
“पत्रकारांनी चांगल्या कामाची सकारात्मक दखल घेतल्यामुळे आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळत राहिली. त्यामुळे सेवेच्या शेवटच्या दिवशी पत्रकार मित्रांचे ऋण व्यक्त करणे माझे कर्तव्य आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
‘पोलीस अधिकारी नसेन, पण मित्र कायम राहीन’
पोलीस सेवेला निरोप देताना त्यांनी भावनिक संदेशही दिला. “उद्यापासून मी पोलीस अधिकारी नसेन; मात्र आपला मित्र कायम राहीन. माझ्या Second Inning मध्येही आपले प्रेम, विश्वास आणि सहकार्य असेच कायम राहू द्या,” असे म्हणत त्यांनी सर्व पत्रकार मित्रांचे मनःपूर्वक आभार मानले.






