श्रीकांत पाचकवडे
अकोला : सणासुदीच्या काळातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने 09013/09014 उधना-अमरावती-उधना साप्ताहिक सुपरफास्ट पूजा स्पेशल ट्रेनला मंजुरी दिली आहे.
ही ट्रेन प्रत्येक सोमवारी उधना येथून सकाळी 11.30 वाजता सुटून रात्री 9.20 वाजता अमरावतीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात अमरावतीहून रात्री 11.30 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 9.35 वाजता उधना येथे पोहोचेल. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात या गाडीचे एकूण 6 फेरे होणार आहेत.
विदर्भाला गुजरात आणि उत्तर महाराष्ट्राशी जोडणारा हा महत्त्वाचा निर्णय असून या निर्णयाबद्दल खासदार अनुप धोत्रे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार व्यक्त केले आहेत.
प्रवाशांसाठी खुशखबर! उधना-अमरावती साप्ताहिक पूजा स्पेशल ट्रेनला मंजुरी
खासदार अनुप धोत्रे यांच्या प्रयत्नांना यश; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे मानले आभार
श्रीकांत पाचकवडे
अकोला : सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने उधना-अमरावती-उधना साप्ताहिक सुपरफास्ट पूजा स्पेशल ट्रेनला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे गुजरात, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
अशी असेल रेल्वेची वेळ
रेल्वे क्रमांक 09013/09014 उधना-अमरावती-उधना साप्ताहिक सुपरफास्ट पूजा स्पेशल ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात धावणार असून या गाडीच्या एकूण सहा फेऱ्या होणार आहेत.
उधना ते अमरावती : दर सोमवारी सकाळी ११.३० वाजता उधना येथून प्रस्थान; त्याच दिवशी रात्री ९.२० वाजता अमरावती येथे आगमन.
अमरावती ते उधना : रात्री ११.३० वाजता अमरावती येथून प्रस्थान; दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३५ वाजता उधना येथे आगमन.
विदर्भ-गुजरात रेल्वे कनेक्टिव्हिटीला बळ
सणासुदीच्या काळात प्रवाशांना होणारी गर्दी आणि प्रवासाची वाढती मागणी लक्षात घेता या विशेष रेल्वेगाडीला मंजुरी मिळाल्याने प्रवाशांना अतिरिक्त रेल्वे सुविधा उपलब्ध होणार आहे. विदर्भाला गुजरात आणि उत्तर महाराष्ट्राशी जोडणाऱ्या या निर्णयामुळे प्रवाशांची सोय होण्यास मदत मिळेल.
या रेल्वेगाडीला मंजुरी दिल्याबद्दल खासदार अनुप धोत्रे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत. सणासुदीच्या काळात प्रवाशांना दिलासा देणारा हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.






