Home Breaking News अकोला–खंडवा रेल्वेमार्गाला गती; २०२७ अखेरपर्यंत रेल्वे सुरू करण्याचे लक्ष्य!

अकोला–खंडवा रेल्वेमार्गाला गती; २०२७ अखेरपर्यंत रेल्वे सुरू करण्याचे लक्ष्य!

 

खासदार अनुप धोत्रे आणि ज्ञानेश्वर पाटील यांच्या प्रयत्नांना यश; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे मानले आभार

 

श्रीकांत पाचकवडे

अकोला : अकोला–खंडवा या बहुप्रतीक्षित रेल्वेमार्गाच्या कामाला वेग आला असून, २०२७ च्या अखेरपर्यंत या मार्गावर रेल्वेसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने युद्धपातळीवर काम सुरू आहे. खासदार अनुप धोत्रे आणि खासदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.

 

नांदेड ते तुकाई थडदरम्यान रेल्वे मार्गावर विशेष रेल्वेगाडी चालवून यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. तसेच अकोला–हिवरखेड मार्गावरील कामही मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

 

६.७ किलोमीटर लांबीचा बोगदा आकाराला

 

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील डोंगराळ भागात ६.७ किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्यात येत आहे. यापैकी एक किलोमीटरचा भाग मध्य प्रदेशात, तर ५.७ किलोमीटरचा भाग महाराष्ट्रात येतो. या बोगद्याचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने मार्गातील महत्त्वाचा अडथळा दूर होण्यास मदत होणार आहे.

 

खासदार अनुप धोत्रे यांनी या प्रकल्पाला गती दिल्याबद्दल केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत. अकोला–खंडवा रेल्वेमार्ग हा विदर्भाला गुजरात आणि उत्तर महाराष्ट्राशी जोडण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार असून, यामुळे पश्चिम विदर्भाच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Don`t copy text!