अकोल्यातील रुग्णालयाने सोडली होती आशा; डॉ. निखिल ठाकरे आणि त्यांच्या टीमच्या अथक प्रयत्नांमुळे 27 वर्षीय तरुणाला मिळाले नवजीवन
खामगाव | प्रतिनिधी
Khangaon News : वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करत खामगाव येथील ठाकरे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअरने गंभीर अपघातात जखमी झालेल्या 27 वर्षीय तरुणाला मृत्यूच्या दारातून परत आणत नवजीवन दिले आहे. अकोल्यातील एका मोठ्या कॉर्पोरेट रुग्णालयात उपचारादरम्यान आशा संपल्याचे सांगण्यात आलेल्या या तरुणावर खामगावात यशस्वी उपचार करण्यात आल्याने परिसरात हॉस्पिटलच्या कार्याचे मोठे कौतुक होत आहे.
अपघातानंतर जीवन-मृत्यूची झुंज
नांदुरा तालुक्यातील अंबोडा येथील रहिवासी अक्षय भोंगे हा काही दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झाला होता. डोक्याला आणि शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने अकोल्यातील एका मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.मात्र उपचारादरम्यान शरीराचा प्रतिसाद कमी होत गेल्याने संबंधित डॉक्टरांनी परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले. कुटुंबीयांची आशा जवळपास संपुष्टात आली होती.
खामगावात दाखल होताच सुरू झाली जीवन वाचविण्याची शर्यत

अखेर शेवटचा पर्याय म्हणून अक्षयला खामगाव येथील ठाकरे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअरमध्ये दाखल करण्यात आले. हॉस्पिटलचे संचालक डॉ. निखिल संजय ठाकरे आणि त्यांच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने रुग्णाची स्थिती पाहून तातडीने उपचार सुरू केले.रुग्णाच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवत आयसीयूमध्ये अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने उपचार करण्यात आले. तब्बल सात ते बारा दिवस डॉक्टर, नर्सिंग स्टाफ आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेत रुग्णाला स्थिर करण्यासाठी प्रयत्न केले.
अत्याधुनिक उपचारांनी घडवला चमत्कार

डॉक्टरांच्या अचूक निदान, योग्य औषधोपचार आणि नियोजनबद्ध उपचारपद्धतीमुळे अक्षयच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होऊ लागली. त्यानंतर आवश्यक असलेली गुंतागुंतीची शस्त्रक्रियाही यशस्वीरीत्या पार पडली.सर्वात महत्त्वाचे म्हणजे, काही दिवसांपूर्वी व्हेंटिलेटरवर असलेल्या अक्षयची प्रकृती इतकी सुधारली की त्याला व्हेंटिलेटरमधून बाहेर काढण्यात यश आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून तो पूर्णपणे बरा होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
अवघ्या दीड वर्षांत मिळवला विश्वास
\
ठाकरे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअरने अल्पावधीतच बुलढाणा जिल्ह्यासह परिसरातील नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. विशेषतः गंभीर रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या आयसीयू, व्हेंटिलेटर, आपत्कालीन उपचार सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता यामुळे अनेक रुग्णांना वेळेत उपचार मिळत आहेत.

“मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज नाही”
हॉस्पिटलचे संचालक डॉ. निखिल ठाकरे यांनी सांगितले की, गंभीर आजार किंवा अपघात झाल्यास रुग्णांना उपचारासाठी मोठ्या शहरांमध्ये धावपळ करावी लागू नये, हा आमचा प्रयत्न आहे. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, प्रशिक्षित डॉक्टर आणि 24 तास उपलब्ध असलेली क्रिटिकल केअर सेवा यामुळे अनेक गंभीर रुग्णांवर यशस्वी उपचार करता येत आहेत.
विविध गंभीर आजारांवर यशस्वी उपचार
सर्पदंश, विषबाधा, पक्षाघात, हृदयविकार, किडनी निकामी होणे, अपघाती दुखापती आणि इतर गंभीर आजारांवरील उपचारांसाठी हे हॉस्पिटल परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचे केंद्र बनले आहे. अनेक जटिल रुग्णांवर यशस्वी उपचार करून हॉस्पिटलने वैद्यकीय क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
डॉक्टरांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक
अक्षय भोंगे याच्या यशस्वी उपचारानंतर त्याच्या कुटुंबीयांनी डॉ. निखिल ठाकरे आणि संपूर्ण वैद्यकीय टीमचे आभार मानले आहेत. तसेच खामगाव आणि परिसरातील नागरिकांकडूनही हॉस्पिटलच्या कार्याचे कौतुक होत असून, ही कामगिरी वैद्यकीय क्षेत्रातील प्रेरणादायी उदाहरण मानली जात आहे.






