Home Breaking News कोरड्या दुष्काळात बळीराजाच्या पाठीशी सरकार; शेतकऱ्यांना त्रास दिल्यास खपवून घेणार नाही; महसूलमंत्री...

कोरड्या दुष्काळात बळीराजाच्या पाठीशी सरकार; शेतकऱ्यांना त्रास दिल्यास खपवून घेणार नाही; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा स्पष्ट इशारा

 

 

श्रीकांत पाचकवडे

अकोला : पावसाअभावी निर्माण झालेल्या कोरड्या दुष्काळामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत शासन बळीराजाच्या पाठीशी ठामपणे उभे असून, शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत दिली जाईल. मात्र, संकटाच्या काळात शेतकऱ्यांना कोणी त्रास देत असेल, तर ते अजिबात सहन केले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

 

अकोला येथील विस्तारित सर्किट हाऊस येथे बावनकुळे यांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी तब्बल ४२७ शेतकऱ्यांनी विविध मागण्यांची निवेदने सादर केली. सावकारी, कर्जबाजारीपणा, पाणीटंचाई, घटलेली भूजल पातळी आणि शेतीसमोरील अन्य अडचणींबाबत शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या.

 

‘शेतकऱ्यांच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवून त्यावर तातडीने उपाययोजना करण्यात येतील. हे सरकार बळीराजाच्या पाठीशी आहे,’ असे आश्वासन बावनकुळे यांनी दिले.

 

शेताच्या बांधावर जाऊन घेतली परिस्थितीची माहिती

यानंतर महसूलमंत्र्यांनी येवता येथे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. अकोला तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी शेतीतील पाणीटंचाई आणि भूजलस्थितीची माहिती घेतली.

 

यावेळी शेख रशीद शेख इस्माईल यांच्या शेताची पाहणी करण्यात आली. शेख रजू शेख रशीद यांनी विहीर असूनही भूजल पातळी खालावल्याने पाण्याची कमतरता भासत असल्याचे सांगितले. पाण्याअभावी शेतीपुढे निर्माण झालेल्या अडचणींची माहितीही त्यांनी दिली.

 

यावेळी प्रदीप हागे, सरपंच वंदनाताई शिरसाट, गोपाल चांदुरकर, संजय वाडेकर, बळीराम ढोरे, काशीराम भोयर, प्रकाश हागे, मुकुंदराव हागे, दीपक भोयर, दीपक गोपनारायण, किशोर जायले, दिलीप गोपनारायण, उमेश मुरूमकर, माधव हागे आणि गजानन धोत्रे यांनीही विविध समस्या मांडल्या.

 

या दौऱ्यात पालकमंत्री अॅड. आकाश फुंडकर, आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार हरीश पिंपळे, महापौर शारदाताई खेडकर, आमदार वसंत खंडेलवाल, माजी आमदार बळीराम शिरस्कार, स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांच्यासह संतोष शिवरकर, जयंत मसले, रणजित खेडकर, चंद्रकांत अंधारे, महादेव मानकर, डॉ. अमित कावरे, राजेश बेले, अनिल गावंडे, वैभव माहोरे, संजय कोरडे, प्रवीण हगवणे, महेंद्र काळे, अंबादास उमाळे, वैशाली निकम, नारायण बोर्डे, अंकुश इंगळे, गिरीश जोशी, डॉ. शंकरराव वाकोडे, किशोर कुचके, नितीन लांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Don`t copy text!