Home Breaking News मानसिक आजाराने ग्रस्त विवाहितेची आत्महत्या

मानसिक आजाराने ग्रस्त विवाहितेची आत्महत्या

मानसिक आजाराने ग्रस्त विवाहितेची आत्महत्या

 

कुही :- पोलीस स्टेशन वेलतुर हद्दीत येणाऱ्या मौजा- धानला येथील मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या विवाहितेने घराशेजारील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

तालुक्यातील धानला येथील दुर्गा अंकित राऊत  (वय-२२) हि काल (दि.6 जून) ला पहाटे 4 वाजता पासून घरातून निघून गेल्याने घरच्यांनी तिचा शोधाशोध घेतला असता ती कुठेच सापडून आली नाही. त्यांनतर घरानजीक विहरीत पहिले असता सायंकाळी ८ वाजता विहरीत तिचा मृतदेह आढळून आला. अंकिता हि मानसिक आजाराने त्रस्त असून त्यावर उपचार घेत होती. त्यामुळेच तिने विहरीत उडी घेत आत्महत्या केली असावी असा बयान तिच्या घरच्यांसह माहेरच्या लोकांनी वेलतूर पोलीसांना दिला आहे.  पुढील तपास ठाणेदार सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनी काटे करीत आहे.

Don`t copy text!