Home Breaking News अवैध  दारू विक्रेत्यावर कारवाई  ; पेट्रोलिंग दरम्यान कुही पोलिसांची कारवाई

अवैध  दारू विक्रेत्यावर कारवाई  ; पेट्रोलिंग दरम्यान कुही पोलिसांची कारवाई

अवैध  दारू विक्रेत्यावर कारवाई 

पेट्रोलिंग दरम्यान कुही पोलिसांची कारवाई

 

कुही :- कुही पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या मिळालेल्या माहितीनुसार  मांढळ येथील अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई करत मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

मंगळवार (दि.10) कुही पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मांढळ येथे पेट्रोलिंगवर असताना कुही पोलिसांना विश्वसनीय मुखबिराद्वारे मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार मांढळ येथे एक इसम घरातून अवैध रित्या देशी दारू बाळगून तिची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. लागलीच कुही पोलिसांनी पंचासमक्ष त्या ठिकाणी जाऊन सदर व्यक्तीची विचारपूस केली असता मनोज दुधपचारे (वय ४०) असे सांगितले . पोलिसांनी आपल्या येण्याचे कारण सांगत त्याच्या त्याच्या पानठेल्याच्या मागे जाऊन तपासणी केली असता  पांढऱ्या रंगाच्या चुंगडित १२ निपा कोकण देशी दारू संत्रा ९९९ प्रत्येकी किमत ७०/- रुपये प्रमाणे असा ८४० रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून आरोपी मनोज बिसन दुधपचारे (वय-४०) रा.वार्ड क्र.3, मांढळ कलम ६५ (ई) मदाका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Don`t copy text!