Home Breaking News शेतकऱ्यांनी घेतला जळगाव (जा.) तहसील कार्यालयाचा ताबा..!

शेतकऱ्यांनी घेतला जळगाव (जा.) तहसील कार्यालयाचा ताबा..!

तिसऱ्या मजल्यावर चढत केले आक्रमक आंदोलन..!
सरकारने तुपकरांच्या आंदोलनाची दखल न घेतल्यास अधिकही तीव्र आंदोलन करू : अक्षय पाटील 
जळगाव (जा.):- शेतकरी नेते तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ दिनांक 17/6/2026 रोजी अक्षय पाटील यांच्या नेतृत्वात जळगाव जामोद तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी चढुन आक्रमक आंदोलन केले.
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती हक्काचा पिक विमा मिळावा या मागणीसाठी गेल्या 3 दिवसांपासुन बुलढाणा येथे रविकांत तुपकर अन्नत्याग आंदोलन करीत आहे.
या आंदोलनाला पाठिंबा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरताना दिसत आहे. मात्र सरकार चा एकही प्रतिनिधी आंदोलन स्थळी न गेल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अशी नाराजी आहे.
तरी शासनाने रविकांत तुपकर यांच्या मागण्यांना विचारात घेऊन त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा विचार करावा व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व पिक विमा द्यावा यासाठी जळगाव जामोद येथे युवा आंदोलक अक्षय पाटील यांनी जळगाव जामोद तहसील कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर चढुन तीव्र आंदोलन केले याप्रसंगी तहसील परिसरीसर घोषणांनी दणाणून गेला होता.
Don`t copy text!