Home Breaking News गिटार अकॅडमी चालकाचे अल्पवयीन मुलीवर अत्त्याचार : आरोपी युवकास पोलिसांनी केली अटक...

गिटार अकॅडमी चालकाचे अल्पवयीन मुलीवर अत्त्याचार : आरोपी युवकास पोलिसांनी केली अटक   

गिटार अकॅडमी चालकाचे अल्पवयीन मुलीवर अत्त्याचार : आरोपी युवकास पोलिसांनी केली अटक   

नागपूर : गिटार शिकविण्याच्या नावाखाली एका क्लासचालकाने क्लासमधील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना नागपुरात घडली. सागर सिंग परोसिया ऊर्फ सॅमसंग (२७, सिव्हिल लाइन्स) असे आरोपीचे नाव आहे. त्याने बंदुकीचा धाक दाखवून पिडीत मुलीच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी देत सातत्याने अत्याचार केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

उज्ज्वलनगर येथील सनशाइन अपार्टमेंटच्या तिसऱ्या माळ्यावर आरोपी रॉकस्टार अकॅडमी नावाने गिटारचे क्लासेस चालवितो. पीडित अल्पवयीन मुलीला गिटार शिकायची होती. त्यामुळे तिने जून महिन्यात त्याच्याकडे क्लास लावला. सुरुवातीला आरोपी अल्पवयीन मुलीशी चांगल्यानेच वागला. मात्र त्यानंतर एके दिवशी तिच्याशी अश्लील चाळे करत घाणेरडे स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. ही बाब खटकल्याने मुलीने तिथेच गिटार सोडली व ती क्लासमधून निघून गेली. २३ जुलै रोजी आरोपी सागरने तिला फोन केला व दहा मिनिटांत भेटायला आली नाही तर घरच्यांना मारून टाकेन, अशी धमकी दिली. घाबरलेली मुलगी क्लासमध्ये गेली असता आरोपीने त्याच्याजवळील बंदूक व चाकूच्या धाकावर तिच्यावर अत्याचार केला.

त्यानंतर त्याने वारंवार तिला जिवे मारण्याची भीती दाखवत क्लासच्या फ्लॅटवर बोलविले व अत्याचार केला. मात्र त्याचा त्रास असह्य झाल्याने अखेर मुलीने कुटुंबीयांना आपबिती सांगितली. ते तिला सोनेगाव पोलिस ठाण्यात घेऊन गेले. तिथे तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सागरविरोधात गुन्हा दाखल करून  त्याला अटक केली आहे.

Don`t copy text!