Home Breaking News पांडेगावात भरदिवसा घरफोडी ; दागिन्यांसह रोख रक्कम लंपास

पांडेगावात भरदिवसा घरफोडी ; दागिन्यांसह रोख रक्कम लंपास

पांडेगावात भरदिवसा घरफोडी

दागिन्यांसह रोख रक्कम लंपास

 

कुही:- तालुक्यातील पांडेगाव येथे घरी कुणीही नसल्यास डाव साधत घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम लंपास केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली.

 

सध्या खरीप हंगामातील शेतीची कामे सुरू असून  शेतीकामांना वेग आला. गुरुवारी पांडेगाव येथील शेतकरी चिंधु वणवे हे भात लावणीसाठी दुपारी 3 च्या दरम्यान घराला कुलूप लावून घरातील सर्व सदस्यांसह शेतात गेले होते.  शेतातील काम आटपून सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घरी येऊन पाहिले असता घराचे कुलूप तुटल्या अवस्थेत दिसून आले. घरात डोकावून पाहिले तर घरातील कपाटाचे दार उघडे दिसून आले.अज्ञात चोरट्यांनी कपाटातील बँग मधील ठेवलेले सोन्याचे 2 जुने मंगळसूत्र, 2 कानातले टॉप व ८ हजारांची रोख असा ६८ रुपयांचा माल लंपास केला. लागलीच कुही पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी  फिंगरप्रिंट व श्वानपथकाला बोलाविले होते. कुही पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या घटनेचा अधिक तपास कुहीचे ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुही पोलीस करीत आहेत.

Don`t copy text!