Home Breaking News भाजपा शिक्षक आघाडीचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर असा पलटवार

भाजपा शिक्षक आघाडीचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर असा पलटवार

मुख्यमंत्र्यांची ‘पांडू हवालदार’शी तुलना म्हणजे महायुतीच्या प्रामाणिकपणाची पावती!

 

श्रीकांत पाचकवडे

अकोला : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची तुलना ‘पांडू हवालदार’ या चित्रपटातील व्यक्तिरेखेशी केल्याच्या विधानावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. या तुलनेतून महायुती सरकारच्या प्रामाणिकपणावरच अप्रत्यक्षपणे शिक्कामोर्तब झाल्याचा दावा भाजपा शिक्षक आघाडीने केला आहे.

 

भाजपा शिक्षक आघाडीचे प्रमुख केशव मालोकार, विजय थोटांगे, मनिष गावंडे यांनी सपकाळ यांच्या विधानावर टीका करताना, काँग्रेसकडे ठोस मुद्दे नसल्याने विरोधकांकडून अशा प्रकारची वक्तव्ये केली जात असल्याचे म्हटले.

 

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार हे सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी आणि राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी काम करीत असल्याचा दावा भाजपा शिक्षक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. काँग्रेसकडून दिली जाणारी आश्वासने प्रत्यक्षात पूर्ण होणार नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली. शिक्षक मतदारांनी अशा आश्वासनांबाबत सजग राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

 

‘काँग्रेसला भाजप आणि संघच दिसतो’

 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना सतत भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघच दिसत असल्याची टीका माधव मानकर यांनी केली. त्यांच्या वक्तव्यांमधून ही बाब वारंवार दिसून येत असल्याचेही ते म्हणाले.

 

महायुतीच्या विजयाचा विश्वास

 

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक हे प्रचंड बहुमताने विजयी होतील, असा विश्वास अंबादास उमाळे यांनी व्यक्त केला. शिक्षकांचा महायुतीवर विश्वास असून, जनसंपर्क अभियानाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचा दावाही त्यांनी केला.

Don`t copy text!