Home Breaking News अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई ; वेलतूर पोलिसांची कारवाई

अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई ; वेलतूर पोलिसांची कारवाई

अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई 

वेलतूर पोलिसांची कारवाई

कुही :- तालुक्यातील वेलतूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजा- खेंडा येथील अवैध दारू विक्रेत्यावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.

वेलतूर पोलीस पेट्रोलिंग करत असताना खात्रीशीर मुखबिराकडून मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार खेंडा येथे एक इसम गावाबाहेर जाणार्या रोडवरील तळ्याच्या पारीवर अवैध रित्या दारूची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. लागलीच पोलिसांनी जाऊन पाहणी केली असता एक व्यक्ती तळ्याच्या पारीवर दारू विकत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी जवळ जाऊन पाहणी केली असता जाऊन त्या व्यक्तीचे नाव विचारले असता त्याने प्रतिक गुरुदेव लांजेवार रा. खेंडा असे सांगितले. पोलिसांनी त्या ठिकाणाची पाहणी केली असता झाडाच्या आडोशाला त्याने दारू लपवल्याचे दिसून आले. पोलिसांना त्या ठिकाणी देशी दारूच्या भिंगरी संत्र नं.1 च्या ११ निपा आढळून आल्या. प्रत्येकी ७० रुपये प्रमाणे ११ निपा एकूण ७७० रुपयांचा माल मिळून आल्याने माल जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोउपनि करंगामी यांनी केली असून याचा पुढील सूर्यभान जळते करत आहेत.

Don`t copy text!