Home Breaking News धक्कादायक ! तरुणाने केले तब्बल 17 विद्यार्थिनींशी अश्लील चाळे; पालकांमध्ये तीव्र संताप

धक्कादायक ! तरुणाने केले तब्बल 17 विद्यार्थिनींशी अश्लील चाळे; पालकांमध्ये तीव्र संताप

धक्कादायक ! तरुणाने केले तब्बल 17 विद्यार्थिनींशी अश्लील चाळे; पालकांमध्ये तीव्र संताप

 

नागपूर : शाळेसमोर शटरचे काम करणाऱ्या एका तरुणाने 17 विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केल्याचा संतापजनक प्रकार पुढे आला आहे. या घटनेविरुद्ध पालकांमध्ये तीव्र संताप आहे. शाळा व्यवस्थापनाला घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर मुख्याध्यापकांनी नंदनवन ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून आरोपीला अटक केली.

रवी प्रकाश लाखे (वय 26, रा. गंगाविहार कॉलनी, नंदनवन) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. रवी शटर बनविण्याचे काम करतो. नंदनवन परिसरातील एका खासगी शाळेसमोर स्टेश्नरी आणि डेली निड्सचे दुकान आहे. दररोज दुपारी शाळेच्या विद्यार्थिनी या दुकानात वस्तू खरेदी करण्यासाठी येत असल्याने गर्दी असते. गेल्या मंगळवारी दुकान मालकाने रवीला शटर दुरूस्त करण्यासाठी बोलावले होते.

 

दरम्यान, शाळेच्या विद्यार्थिनी दुकानात चॉकलेट आणि इतर वस्तू खरेदी करण्यासाठी आल्या. गर्दी असल्याने रवी सुद्धा वस्तू देण्यात दुकान मालकाची मदत करू लागला. या दरम्यान त्याने विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केले. काही विद्यार्थिनींना त्याने पैसे न घेताच चॉकलेट दिले आणि आक्षेपार्हरित्या स्पर्श करू लागला.

मुख्याध्यापकांनी नोंदवली तक्रार

शुक्रवारी मुख्याध्यापकांनी नंदनवन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रकरणाची गंभीर लक्षात घेता नंदनवन पोलिसांनी रवीविरुद्ध विनयभंग आणि पोक्सो अॅक्टच्या कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. दुकान मालकाकडून त्याच्याबद्दल माहिती घेत त्याला अटक करण्यात आली.

विद्यार्थिनींनी दिली कुटुंबीयांना माहिती

दोन दिवसांपूर्वी 2 विद्यार्थिनींनी रवीच्या कुकृत्याबाबत कुटुंबीयांना माहिती दिली. दोघींचेही कुटुंबीय शाळेत पोहोचले आणि मुख्याध्यापकांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर शाळा व्यवस्थापनाकडून इतर विद्यार्थिनींची विचारपूस करण्यात आली. एकूण 17 विद्यार्थिनींनी रवीने अश्लील चाळे केल्याची माहिती दिली.

 

Don`t copy text!