Home Breaking News ऑपरेशन प्रहार : अकोला पोलिसांची अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई; ८...

ऑपरेशन प्रहार : अकोला पोलिसांची अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई; ८ जणांवर कायदेशीर कारवाई

 

 

श्रीकांत पाचकवडे

अकोला : अमली पदार्थांचे सेवन, विक्री आणि तस्करीला आळा घालण्यासाठी अकोला जिल्हा पोलिसांनी ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अकोला शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कारवाई करत अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या ८ इसमांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली.

 

पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. १७ सप्टेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अकोला शहरात विशेष मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान अकोट फाईल, जुने शहर, कोतवाली आणि रामदासपेठ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संबंधित इसमांविरुद्ध कारवाई करण्यात आली.

 

कारवाई करण्यात आलेले ८ इसम

चेतन संदीप शिंदे (२२), रा. देशमुख फेल, अकोला.

 

जमीरोद्दीन कामरोद्दीन (२४), रा. मर्गटजवळ, मोहतामिल, अकोला.

 

शैलेश मधुकर धांडे (४३), रा. महाकाली नगर, हरिहरपेठ, अकोला.

 

शंकर विजय लाखे (२१), रा. रमाबाई आंबेडकर नगर, जुने शहर, अकोला.

 

अब्दुल समद अब्दुल लतीफ (६०), रा. कादरीपुरा, अकोट फाईल, अकोला.

 

शेषराव रमेश वारोकार (३५), रा. पंचशील नगर, वाडेगाव, ता. बाळापूर.

 

शिवशंकर अरुण सोनटक्के (४०), रा. धोतर्डी, ता. जि. अकोला.

 

शेख अफसर शेख अहमद (३८), रा. अशोक नगर, अकोट फाईल, अकोला.

 

अमली पदार्थांविरोधातील मोहीम सुरूच राहणार

अमली पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्यासोबतच कौटुंबिक व सामाजिक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अमली पदार्थांचे सेवन, विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांकडून विशेष लक्ष दिले जात आहे.

 

अकोला शहर आणि जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधातील कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहणार असून, सेवन करणाऱ्यांसह विक्री व तस्करी करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. नागरिकांनी अमली पदार्थांशी संबंधित कोणतीही माहिती पोलिसांना देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Don`t copy text!