Home Breaking News अकोल्यात हिंदू-मुस्लिम एकतेचा सुंदर संदेश; गणेश विसर्जन मिरवणुकीचे आमदार साजिद खान पठाण...

अकोल्यात हिंदू-मुस्लिम एकतेचा सुंदर संदेश; गणेश विसर्जन मिरवणुकीचे आमदार साजिद खान पठाण यांनी केले स्वागत

श्रीकांत पाचकवडे

अकोला : अकोल्यातील सामाजिक सलोखा आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित झाली. अकोल्याच्या प्रथम मानाचा गणपती श्री बाराभाई गणेश उत्सव मंडळाच्या गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीचे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांनी जयहिंद चौक येथे स्वागत केले.

 

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यात विविध समाजातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत परस्पर सन्मान, बंधुभाव आणि आपुलकीचा संदेश दिला. धार्मिक विविधता जपत सामाजिक एकोपा मजबूत करण्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.

 

‘धर्म वेगळे असले तरी माणुसकी आणि बंधुभाव सर्वांना जोडतो’, हा संदेश या प्रसंगातून ठळकपणे समोर आला. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने अकोल्याच्या सामाजिक ऐक्याचे दर्शन घडले.

 

यावेळी पालकमंत्री आकाश फुंडकर, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, माजी आमदार बबनराव चौधरी, काँग्रेस कमिटी अकोला ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश तायडे, महानगराध्यक्ष महेंद्र गवई, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अॅड. मोतीसिंग मोहता, सिद्धार्थ शर्मा यांच्यासह काँग्रेसचे नगरसेवक आकाश कवडे, कपिलराव देव, मनीष मिश्रा, पराग कांबळे, अन्नपूर्णा पाटील, डॉ. अंशुमन कोरपे, देशमुख, विजय देशमुख, राजेश मते, मनिष हिवराळे, कपील लावलेलं, अंकुश तायडे, विजय जामनिक, अभिजित तंवर, प्रशांत प्रधान तसेच काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Don`t copy text!