Home Breaking News शब्दाला पक्के ‘देवा भाऊ’; शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला! ...

शब्दाला पक्के ‘देवा भाऊ’; शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला! आमदार रणधीर सावरकर यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार!

श्रीकांत पाचकवडे

अकोला : पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाशिम जिल्ह्यातील मानोरा आणि कारंजा परिसरात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत “उद्या जीआर काढतो” असा शब्द त्यांनी दिला होता.

 

मुख्यमंत्र्यांनी दिलेला हा शब्द अवघ्या काही तासांत पूर्ण केल्याबद्दल आमदार रणधीर सावरकर यांनी त्यांचे कौतुक केले. गणेश विसर्जनाचा दिवस असतानाही शेतकऱ्यांच्या प्रश्नाला प्राधान्य देत शासनाने दुष्काळी उपाययोजनांसंदर्भात शासन निर्णय जारी केल्याचे सावरकर यांनी नमूद केले.

 

शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार

 

“शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे दुःख ऐकायचे आणि दिलेला शब्द पूर्ण करायचा, हीच देवा भाऊंची कार्यपद्धती आहे. त्यामुळे ते शब्दाला पक्के आहेत,” असे आमदार सावरकर यांनी म्हटले.

 

कर्जमाफी, वीजसवलत, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरील निर्णय, पांदण रस्ते आणि महिलांच्या सबलीकरणासाठी घेतलेले निर्णय अशा विविध माध्यमातून महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

दिवाळी काळी होऊ नये यासाठी निर्णय

 

शेतकऱ्यांच्या हातात मदत पोहोचावी आणि संकटाच्या काळात त्यांना दिलासा मिळावा, यासाठी शासनाने निर्णय घेतले आहेत. केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष मदतीच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली असून शेतकऱ्यांची दिवाळी संकटाच्या छायेत जाऊ नये, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सावरकर यांनी सांगितले.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे आणि समितीतील सर्व सदस्यांचे आमदार रणधीर सावरकर व खासदार अनुप धोत्रे यांनी अकोला, पश्चिम विदर्भ तसेच राज्यातील शेतकऱ्यांच्या वतीने अभिनंदन केले.

 

“संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून तातडीने निर्णय घेणाऱ्या सरकारचे आम्ही आभार मानतो,” असेही सावरकर यांनी स्पष्ट केले.

Don`t copy text!