Home Breaking News अकोला पोलीस दला तर्फे ऑक्टोबर २०२६” सायबर जनजागृती महिना

अकोला पोलीस दला तर्फे ऑक्टोबर २०२६” सायबर जनजागृती महिना

 

श्रीकांत पाचकवडे 

अकोला : अकोला पोलीस दला तर्फे मा. पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्ह्यात १ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान व्यापक जनजागृती मोहीम “डिजिटल एकता, सुरक्षित भविष्य” महाराष्ट्र सायबर ही सायबर सुरक्षा व डिजिटल तपासासाठीची राज्य नोडल एजन्सी असून, इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) यांच्या सहकार्याने ऑक्टोबर महिना “सायबर जनजागृती महिना” म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्याअंतर्गत अकोला पोलीस दलातर्फे १ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत जिल्ह्यात सात टप्प्यांमध्ये मोहीम राबवली जाणार आहे. डिजिटल अरेस्ट, केवायसी व यूपीआय फसवणूक, कर्ज-अॅप शोषण, शेअर ट्रेडिंग फसवणूक आणि वैवाहिक संकेतस्थळांवरील फसवणूक अशा प्रचलित सायबर गुन्ह्यांबाबत नागरिकांमध्ये प्रत्यक्ष संवादातून शाश्वत जनजागृती करणे, हा मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

 

मोहिमेची उद्दिष्टे-केवळ डिजिटल संदेशांऐवजी प्रत्यक्ष, समोरासमोर संवादातून जनजागृती करणे.

 

पोलीस ठाणे स्तरावर प्रलंबित मनी रिस्टोरेशन मॉड्यूल (MRM) अक्नोलेजमेंट व तक्रार निवारण (GRM) प्रकरणे निकाली काढून पीडितांना जलद दिलासा देणे. बैंक, दूरसंचार किरकोळ विक्री व असुरक्षित क्षेत्रांमधील समन्वित कारवाईद्वारे म्युल खाती व कॅश-आउट यंत्रणा खंडित करणे.

 

ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, लघु-व्यापारी व ग्रामीण समुदाय या अधिक जोखमीच्या गटांना विशेष शिबिरे व कॅम्पद्वारे संरक्षण देणे.

 

मोहिमेचा समारोप जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या माध्यमातून व्यापक जनसहभागाने करणे.

 

मोहिमेचे टप्पे व प्रमुख कार्यक्रम

 

-टप्पा १ मोहीम प्रारंभ व संस्थात्मक पायाभरणी (१ ते ४ ऑक्टोबर): मोहिमेच्या उद्घाटनानिमित्त ३०-४५ सेकंदांचा जनजागृ‌ती व्हिडिओ संदेश प्रसारित केला जाईल. सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी तो आपल्या सोशल मीडिया स्टेटसवर पोस्ट करतील, तसेच स्थानिक रेडिओ चॅनेल्सवरही संदेश प्रसारित होईल. २ ऑक्टोबर (महात्मा गांधी जयंती) रोजी शाळा व महाविद्यालयांमध्ये विशेष पोलीस पथके भेट देऊन “क्लिक करण्यापूर्वी विचार करा” ही सायबर हायजीन प्रतिज्ञा विद्यार्थ्यांना देतील. ३ ऑक्टोबर रोजी १९३० हेल्पलाइनची प्रसिद्धी केली जाईल, तसेच मोहल्ला व शांतता समितीच्या बैठकांमध्ये आर्थिक परतावा यंत्रणा (MRM) व GRM बाबत माहिती दिली जाईल. ४ ऑक्टोबर रोजी बीट कर्मचारी गृहनिर्माण संस्थांचे प्रवेशद्वार व व्यवस्थापन मंडळांपर्यंत पोहोचून हँडबिल व सल्ला पत्रके वितरित करतील.

 

टप्पा २ कृतिशील सायबर न्याय व ज्येष्ठ नागरिक सुरक्षा (५ ते ७ ऑक्टोबर): प्रत्येक पोलीस ठाण्यात पीडित मदत कक्ष स्थापन करून प्रलंबित अक्नोलेजमेंटमधील किमान ५०% पीडितांना बोलावून MRM निकाली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मदत केली जाईल. ६ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नागरिक उद्याने, कल्याण संघटना व हास्यक्लब येथे “डिजिटल अरेस्ट” व पेन्शन फसवणुकीविरोधात संवादात्मक शिबिरे घेतली जातील.

 

टप्पा ३ ग्रामीण, व्यापारी व शांतता समिती संमेलने (८ ते ११ ऑक्टोबर): ८ ऑक्टोबर रोजी सर्व प्रलंबित GRM प्रकरणे निकाली काढण्याची मोहीम राबवली जाईल. ९ ऑक्टोबर रोजी बाजार समित्या (मंडई), ग्रामीण चौक, ग्रामपंचायती व नागरी वॉर्ड कार्यालयांमध्ये सुरक्षित डिजिटल बैंकिंग, यूपीआय फसवणूक व घातक अॅप्सबाबत टाऊन हॉल पद्धतीचे संवादात्मक कार्यक्रम होतील. १०-११ ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी प्रत्यक्ष क्षेत्रीय तपासणी करून मध्य-महिना आढावा घेणार आहेत.

 

टप्पा ४ – नवरात्र दैनंदिन कार्यक्रम व महाविद्यालयीन चर्चासत्रे (१२ ते २० ऑक्टोबर): नवरात्रीच्या नऊ दिवसांत दररोज एका विशिष्ट सायबर धोक्यावर जनजागृती केली जाईल.

 

दिनांक विषय उपक्रम १२ ऑक्टोबर डिजिटल अरेस्ट फसवणूक इयत्ता ९ वी १२ वी वर्गसत्रे, १३ ऑक्टो साइडलोडेड एपीके मालवेअर निवासी परिसर जनजागृती बैठका

 

१४ ऑक्टो केवायसी फसवणूक इशारे किरकोळ बाजार संघटना बैठका, १५ ऑक्टो बनावट शेअर ट्रेडिंग फसवणूक महाविद्यालय व विद्यापीठ चर्चासत्रे

 

१६ ऑक्टो- शिकारी ऑनलाइन कर्ज अॅप्स औद्योगिक केंद्रांत मार्गदर्शन कक्ष. १७ ऑक्टो बनावट खरेदी संकेतस्थळे बाजार मोहीम

 

१८ ऑक्टो- युटिलिटी स्पूफिंग (वीज/गॅस) बीट-स्तरीय सायंकालीन संमेलने, १९ ऑक्टो विवाह संस्था वेबसाईट फसवणूक महिला संस्थांशी जनसंपर्क

 

२० ऑक्टो बनावट कस्टमर केअर नंबर बस/रेल्वे स्थानके व ट्रैफिक सिग्नल्सवर जनजागृती

 

टप्पा ५ – म्युल पायाभूत सुविधा व पुरवठा साखळीविरोधी कारवाई (२१ ते २६ ऑक्टोबर): २१ व २२ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीयीकृत, सहकारी व खासगी बँका, पतपेढ्या व वित्तीय संस्थांच्या प्रमुखांच्या भेटी घेऊन कठोर केवायसी अनुपालन, मोठ्या व्यवहारांसाठी त्वरित सतर्कता, तसेच म्युल खाती व एटीएम हॉटस्पॉट्स ओळखण्याबाबत संयुक्त बैठका घेतल्या जातील. २३ ऑक्टोबर रोजी सिम कार्ड वितरण केंद्रांवर तपासणी करून बायोमेट्रिक बायपास विक्री रोखली जाईल. २४ व २५ ऑक्टोबर रोजी झोपडपट्टी व कामगार वसाहतींमध्ये, कमी मोबदल्यासाठी बैंक खाते भाड्याने देण्याच्या मोहाला आळा घालण्यासाठी जनजागृती केली जाईल. २६ ऑक्टोबर रोजी वसतिगृहे व विद्यार्थी केंद्रांमध्ये खाते/कागदपत्रे भाड्याने देण्याचे कायदेशीर परिणाम, तसेच डिजिटल अरेस्ट, मॉर्फिग व डीपफेक धोक्यांबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली जाईल.

 

टप्प-६ व ७ सायबर हायजीन व भव्य समारोप (२७ ते ३१ ऑक्टोबर): २७ ते ३० ऑक्टोबर दरम्यान जिल्हा सायबर पोलीस तर्फे पोलीस विभाग तसेच पोलीस ठाणे हद्दीतील शासकीय कार्यालयांमध्ये सायबर हायजीन व्याख्याने होतील. यात अॅप्स अद्ययावत ठेवणे, सर्व सोशल मीडिया खात्यांवर मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन (MFA) सक्षम करणे, न वापरलेले अॅप्स काढणे, सशक्त पासवर्ड, डेटा बैंकअप व गोपनीयता सेटिंग्ज याबाबत मार्गदर्शन केले जाईल. ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७:०० वाजता “डिजिटल एकता, सुरक्षित भविष्य” या घोषवाक्याखाली प्रत्येक पोलीस ठाण्यातर्फे एकता धावन (Marathon/सायक्लोथॉन) आयोजित केले जाईल. सायबर प्रतिज्ञा मोहिमेदरम्यान नागरिकांना “क्लिक करण्यापूर्वी विचार करा” ही प्रतिज्ञा दिली जाईल. “थांबा. विचार करा. पडताळणी करा. मगच क्लिक करा.” हा मोहिमेचा मंत्र आहे. नागरिकांना आवाहन कोणतीही सरकारी यंत्रणा किंवा पोलीस व्हिडिओ कॉलद्वारे “डिजिटल अरेस्ट” करत नाहीत. अशा कॉलवर घाबरू नका. तुमचा ओटीपी, पिन, पासवर्ड, सीव्हीव्ही किंवा इतर गोपनीय माहिती कोणालाही देऊ नका.

 

अनोळखी लिंक, क्यूआर कोड, एपीके फाईल्स किंवा संलग्नके उघडू नका. कमी मोबदल्याच्या आमिषाने आपले बैंक खाते, सिम कार्ड किंवा कागदपत्रे इतरांना वापरण्यास देऊ नका. अशा खात्यांचा गैरवापर झाल्यास खातेधारकावरही गुन्हा दाखल होऊ शकतो ज्येष्ठ नागरिकांनी अनोळखी व्यक्तींच्या कॉलवर विश्वास ठेवू नये आणि कुटुंबीयांशी चर्चा करून निर्णय घ्यावा. सायबर फसवणूक झाल्यास तातडीने राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन १९३० तर संपर्क साधा किंवा www.cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवा. पैसे गेल्यानंतर जितक्या लवकर तक्रार कराल, तितकी रक्कम वाचण्याची शक्यता अधिक असते. अकोला जिल्ह्यातील सर्व नागरिक, विद्यार्थी, व्यापारी, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संस्था, बँका व प्रसारमाध्यमांनी या मोहिमेत सक्रिय सहभागी होऊन सायबर सुरक्षित समाज घडवण्यासाठी पोलीस दलाला सहकार्य करावे, असे आवाहन अकोला पोलीस दला तर्फे करण्यात येत आहे.

 

‘थांबा… विचार करा… पडताळणी करा… मगच क्लिक करा!’

 

ऑक्टोबरमध्ये अकोला पोलिसांची ‘सायबर जनजागृती’ मोहीम, एलसीबी पीआय नितीन लेव्हरकर यांची माहिती

 

 

श्रीकांत पाचकवडे

अकोला : डिजिटल व्यवहार वाढत असताना सायबर फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर अकोला पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली १ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सायबर जनजागृती महिना’ राबविण्यात येणार आहे. ‘डिजिटल एकता, सुरक्षित भविष्य’ या घोषवाक्याखाली जिल्ह्यात सात टप्प्यांत विविध उपक्रम राबविले जाणार आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख नितीन लेव्हरकर यांनी दिली.

 

 

महाराष्ट्र सायबर ही राज्यातील सायबर सुरक्षा व डिजिटल तपासासाठीची नोडल यंत्रणा असून, इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) यांच्या सहकार्याने ही जनजागृती मोहीम राबविली जात आहे. डिजिटल अरेस्ट, केवायसी व यूपीआय फसवणूक, बनावट कर्ज-अॅप, ऑनलाइन शेअर ट्रेडिंग, बनावट खरेदी संकेतस्थळे तसेच वैवाहिक संकेतस्थळांवरील फसवणूक याबाबत नागरिकांमध्ये प्रत्यक्ष संवादातून जागृती केली जाणार आहे.

 

फक्त सोशल मीडिया नव्हे, थेट नागरिकांशी संवाद

मोहिमेचा केंद्रबिंदू केवळ ऑनलाइन संदेश प्रसारित करण्याऐवजी पोलीस आणि नागरिकांमध्ये प्रत्यक्ष संवाद वाढविणे हा आहे. पोलीस ठाणे स्तरावर प्रलंबित मनी रिस्टोरेशन मॉड्यूल (MRM) व तक्रार निवारण (GRM) प्रकरणांचा निपटारा करून सायबर फसवणुकीतील पीडितांना जलद दिलासा देण्यावरही भर दिला जाणार आहे.

 

ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, लघु व्यापारी आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विशेष शिबिरे घेण्यात येणार आहेत. बँका, दूरसंचार क्षेत्र आणि इतर संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून म्युल खाती व कॅश-आउट यंत्रणा रोखण्यासाठीही कारवाई केली जाणार आहे.

 

१ ते ४ ऑक्टोबर : मोहिमेची सुरुवात

 

मोहिमेच्या प्रारंभी ३० ते ४५ सेकंदांचा सायबर जनजागृती व्हिडिओ प्रसारित केला जाईल. पोलीस अधिकारी व कर्मचारी सोशल मीडिया स्टेटसच्या माध्यमातून तो नागरिकांपर्यंत पोहोचवतील.

 

२ ऑक्टोबरला शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना ‘क्लिक करण्यापूर्वी विचार करा’ ही सायबर हायजीन प्रतिज्ञा देण्यात येईल. ३ ऑक्टोबरला १९३० हेल्पलाइनची जनजागृती करण्यात येणार असून, मोहल्ला व शांतता समित्यांच्या बैठकीत आर्थिक फसवणुकीनंतरच्या परतावा प्रक्रियेबाबत माहिती दिली जाईल. ४ ऑक्टोबरला गृहनिर्माण संस्थांमध्ये हँडबिल व मार्गदर्शक पत्रकांचे वाटप केले जाईल.

 

५ ते ७ ऑक्टोबर : पीडितांना मदतीचा हात

 

प्रत्येक पोलीस ठाण्यात पीडित मदत कक्ष सुरू करून प्रलंबित प्रकरणांतील नागरिकांना मार्गदर्शन केले जाईल. ६ ऑक्टोबरला ज्येष्ठ नागरिक उद्याने, कल्याण संघटना व हास्यक्लबमध्ये ‘डिजिटल अरेस्ट’ आणि पेन्शन फसवणुकीविरोधात विशेष शिबिरे घेण्यात येतील.

 

८ ते ११ ऑक्टोबर : ग्रामीण भागासह व्यापाऱ्यांमध्ये जागृती

 

प्रलंबित GRM प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाणार आहे. बाजारपेठा, ग्रामपंचायती, ग्रामीण चौक आणि नागरी वॉर्ड कार्यालयांमध्ये सुरक्षित डिजिटल बँकिंग, यूपीआय फसवणूक आणि धोकादायक अॅप्सबाबत संवादात्मक कार्यक्रम होतील. उपविभागीय अधिकारी क्षेत्रीय पाहणी करून मोहिमेचा मध्यावधी आढावा घेतील.

 

१२ ते २० ऑक्टोबर : नवरात्रीत रोज नवा सायबर धोका

 

नवरात्रीच्या नऊ दिवसांत दररोज एका सायबर धोक्यावर जनजागृती केली जाणार आहे. यामध्ये—

 

१२ ऑक्टोबर: डिजिटल अरेस्ट फसवणूक

 

१३ ऑक्टोबर: साइडलोडेड APK व मालवेअर

 

१४ ऑक्टोबर: केवायसी फसवणूक

 

१५ ऑक्टोबर: बनावट शेअर ट्रेडिंग फसवणूक

 

१६ ऑक्टोबर: घातक ऑनलाइन कर्ज-अॅप

 

१७ ऑक्टोबर: बनावट खरेदी संकेतस्थळे

 

१८ ऑक्टोबर: वीज/गॅसच्या नावाने युटिलिटी स्पूफिंग

 

१९ ऑक्टोबर: वैवाहिक संकेतस्थळांवरील फसवणूक

 

२० ऑक्टोबर: बनावट कस्टमर केअर क्रमांक

 

या काळात शाळा-महाविद्यालये, निवासी परिसर, बाजारपेठा, औद्योगिक क्षेत्रे, महिला संस्था, बस व रेल्वे स्थानके आदी ठिकाणी जनजागृती कार्यक्रम घेतले जातील.

 

२१ ते २६ ऑक्टोबर : ‘म्युल अकाउंट’वर पोलिसांचा फोकस

 

बँका, पतपेढ्या आणि वित्तीय संस्थांसोबत बैठका घेऊन संशयास्पद खाती, मोठे व्यवहार आणि एटीएम हॉटस्पॉट्सबाबत समन्वय साधला जाईल. सिमकार्ड वितरण केंद्रांची तपासणी तसेच बँक खाते, सिमकार्ड किंवा कागदपत्रे भाड्याने देण्याच्या प्रकारांविरोधात जनजागृती केली जाणार आहे.

 

विद्यार्थ्यांना खाते किंवा कागदपत्रे इतरांना वापरासाठी दिल्यास होणाऱ्या कायदेशीर परिणामांची माहिती देतानाच डिजिटल अरेस्ट, मॉर्फिंग आणि डीपफेक यांसारख्या धोक्यांबाबतही मार्गदर्शन केले जाईल.

 

२७ ते ३१ ऑक्टोबर : ‘सायबर हायजीन’ आणि भव्य समारोप

 

शासकीय कार्यालयांमध्ये सायबर हायजीनविषयी व्याख्याने घेऊन अॅप्स अद्ययावत ठेवणे, सोशल मीडिया खात्यांवर मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन (MFA) सुरू करणे, अनावश्यक अॅप्स हटविणे, मजबूत पासवर्ड वापरणे, डेटाचा बॅकअप घेणे आणि गोपनीयता सेटिंग्ज सुरक्षित ठेवणे याबाबत मार्गदर्शन केले जाईल.

 

३१ ऑक्टोबरला सकाळी ७ वाजता ‘डिजिटल एकता, सुरक्षित भविष्य’ या घोषवाक्याखाली जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या माध्यमातून एकता धावण/सायक्लोथॉन आयोजित करण्यात येणार आहे.

 

‘थांबा… विचार करा… पडताळणी करा… मगच क्लिक करा!’

 

सायबर फसवणूक टाळण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना काही महत्त्वाचे संदेश दिले आहेत. कोणतीही सरकारी यंत्रणा किंवा पोलीस व्हिडिओ कॉलद्वारे ‘डिजिटल अरेस्ट’ करत नाहीत. त्यामुळे अशा कॉलला घाबरू नये.

 

ओटीपी, पिन, पासवर्ड, सीव्हीव्ही यांसारखी गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये. अनोळखी लिंक, क्यूआर कोड, APK फाईल किंवा संशयास्पद अटॅचमेंट उघडू नये. कमी पैशांच्या आमिषाने बँक खाते, सिमकार्ड किंवा कागदपत्रे इतरांना वापरायला देऊ नयेत.

 

सायबर फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइनवर संपर्क साधावा किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवावी. फसवणुकीनंतर जितक्या लवकर तक्रार केली जाते, तितक्या लवकर व्यवहार रोखण्याची संधी उपलब्ध होऊ शकते.

 

अकोला जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी, व्यापारी, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संस्था, बँका आणि प्रसारमाध्यमांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून सायबर सुरक्षित समाज निर्माण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन अकोला पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.

Don`t copy text!