Home Breaking News राजोला शेतशिवारात वीज पडल्याने बैल ठार

राजोला शेतशिवारात वीज पडल्याने बैल ठार

कुही :- तालुक्यातील मौजा राजोला येथे शेतशिवारात वीज पडून एक बैल ठार झाला. एन खरीप हंगामाच्या पेरणीच्या काळात बैल ठार झाल्याने शेतकर्‍याचे  ५०हजार रुपयांचे नुकसान झाले.

गुरूवारी (२७ जुन) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास हि घटना घडली. शेतकरी रामप्रकाश सीताराम कांबळे यांची राजोला शिवारात पाच एकर शेती आहे.नेहमी प्रमाणे ते बैल घेऊन शेतावर गेले होते. अशातच अचानक पाऊस व वादळ येऊन वीज कडाडली व यातच एका बैलावर वीज कोसळल्याने बैलाचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेत शेतकरी यांचे अंदाजे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. घटनास्थळी जिल्हा परिषद सदस्य अरुण हटवार,माजी सरपंच प्रभू वैद्य,देवाजी घुगुस्कार,अतुल लांजेवार,भास्कर वैद्य,मंगेश वैद्य, शालीक घुगुस्कार,भगवान घुमरे,रामू घुमरे,शिवदास वैद्य,पंकज देवगडे,मुकुंदा वैद्य, राजहंस घुगुस्कार,उमेश उमक यांनी भेट देऊन नुकसान ग्रस्त शेतकरी यास भरपाई देण्याची मागणी केली आहे.

Don`t copy text!