Home Breaking News दोन दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा मृतदेह निर्जनस्थळी आढळला संशयास्पद अवस्थेत : तीन संशयित...

दोन दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा मृतदेह निर्जनस्थळी आढळला संशयास्पद अवस्थेत : तीन संशयित ताब्यात

दोन दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा मृतदेह निर्जनस्थळी आढळला संशयास्पद अवस्थेत : तीन संशयित ताब्यात

नागपूर : नागपूर शहरातील भांडेवाडी परिसरात एका ३१ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सतीश कालीदास मेश्राम (वय ३१, रा. एकतानगर पारडी) असे मृत तरुणाचे नाव असून, तो बांधकाम मजूर म्हणून सेंट्रिंगचे काम करत होता. शुक्रवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली असून, पारडी पोलिसांनी या प्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

सतीश मेश्राम दोन दिवसांपासून बेपत्ता होता. रात्री तो एका मित्रासोबत घरातून बाहेर पडला, मात्र त्यानंतर परतलाच नाही. कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला पण काहीही माहिती न मिळाल्याने त्यांनी पारडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. शुक्रवारी सायंकाळी भांडेवाडी रेल्वे स्थानकाजवळ बांधकाम सुरू असलेल्या नव्या प्लॅटफॉर्मजवळ काही नागरिकांना निर्जनस्थळी संशयास्पद अवस्थेत मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. पारडी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असता मृतदेह सतीश मेश्राम याचाच असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांनी मृतदेह मेयो रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला असून, प्राथमिक तपासात ही हत्या पूर्वनियोजित असल्याचे दिसून येते. या प्रकरणात पारडी पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली याचे अद्याप नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी वैयक्तिक वाद, आर्थिक व्यवहार किंवा भांडण या शक्यतेवर पोलिसांचा तपास सुरू आहे.

Don`t copy text!