Home Breaking News अपघातग्रस्त, आजारी आणि विषबाधित १५ गोवंशांवर उपचार; १२ गोवंशांना जीवदान, एकनिष्ठा गौ...

अपघातग्रस्त, आजारी आणि विषबाधित १५ गोवंशांवर उपचार; १२ गोवंशांना जीवदान, एकनिष्ठा गौ सेवा फाउंडेशनचा सेवाभावी उपक्रम

 

खामगाव, दि. २ ऑक्टोबर : शहरातील अपघातग्रस्त, आजारी तसेच विषबाधेमुळे गंभीर अवस्थेत असलेल्या बेवारस गोवंशांसाठी एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशनने माणुसकीचा आदर्श निर्माण करणारे सेवाकार्य केले आहे. १२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत फाउंडेशनच्या गौसेवकांनी शहरातील विविध भागांत आढळलेल्या १५ गोवंशांवर उपचार केले. यापैकी १२ गोवंशांना उपचाराअंती जीवदान मिळाले, तर उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या तीन गोवंशांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

 

फाउंडेशनच्या गौसेवकांनी शहरातील मेनरोड फरशी, भगतसिंग चौक, सनी पॅलेस, शिवाजी वेस, आईसाहेब मंगल कार्यालय परिसर, बसस्थानक, गोकुल नगर, सावजी लेआऊट, महाकाल चौक, गजानन नगरी, पंढरी बाबा नगर, तलाव रोड, शामल नगर, बारादरी, मस्तान चौक, भुसावळ चौक आदी परिसरांत जाऊन गरजू गोवंशांवर उपचार केले.

एकनिष्ठा गौ सेवा

या सेवाकार्यात गौसेवक सुरजभैय्या यादव, डॉ. नितीन गायकवाड, डॉ. राज देशमुख, डॉ. रंजीत राठोड, डॉ. शुभम जरांगे, पवन घडेकर, डॉ. ऋषीकेश बोरे, गजानन माकोडे, किसन गांधी, मोहन शर्मा, गौरव कवटेकर, सुरज निंबाळकर, अतुल निमकर्डे, सागर जाधव, प्रवीण ठाकरे, शिवा मंडोकार, दर्शन पवार, अभिषेक गावंडे, यश टिकार, गोलू शर्मा, राहुल ठाकुर, अविनाश इंगळे, दुर्गेश सारसर, संजय थोरात, प्रदीप शमी, चेतन कदम आणि योगेश राऊत यांनी मोलाचे योगदान दिले.

 

उपचाराचा संपूर्ण खर्च फाउंडेशनकडून

 

विशेष म्हणजे, या संपूर्ण उपचारासाठी लागणारा खर्च एकनिष्ठा गौ सेवा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला. रस्त्यावर जखमी किंवा आजारी अवस्थेत पडलेल्या गोवंशांकडे केवळ प्राणी म्हणून न पाहता त्यांच्यावर उपचार करून त्यांचे प्राण वाचविण्यासाठी फाउंडेशनचे कार्यकर्ते सातत्याने प्रयत्नशील असल्याचे या उपक्रमातून दिसून आले.

 

“गोवंश जखमी किंवा आजारी अवस्थेत आढळल्यास नागरिकांनी त्याची माहिती फाउंडेशनच्या गौसेवकांना द्यावी. वेळेत उपचार मिळाल्यास अनेक गोवंशांचे प्राण वाचवता येऊ शकतात,” असे आवाहन फाउंडेशनचे पंकज अंबारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले.

Don`t copy text!