Home Breaking News स्व. श्रा.स. बावस्कर गुरुजी स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार वितरित

स्व. श्रा.स. बावस्कर गुरुजी स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार वितरित

 

लॉयन्स क्लब खामगांव व धन्वंतरी चॅरीटेबल मेडीकल फाऊंडेशनचा उपक्रम

 

खामगांव : लॉयन्स क्लब खामगांव व धन्वंतरी चॅरिटेबल मेडीकल फाऊंडेशनच्या वतीने स्व. श्रा.स. बावस्कर गुरुजी स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या तेराव्या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण शुक्रवार दि. ०२ ऑक्टोबर २०२६ रोजी नगर परिषद लॉयन्स आय हॉस्पीटल सभागृह, जीएसटी ऑफीस समोर, नांदुरा रोड, खामगांव येथे आयोजित कार्यक्रमात संपन्न झाले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लॉयन्स क्लबचे अध्यक्ष लॉ. पिनेश कमाणी, प्रमुख पाहुणे लॉयन्स प्रांत ३२३४ एच२ चे प्रांतपाल पीएमजेएफ लॉ. राहुलजी औसेकर, प्रमुख अतिथी म्हणून अप्पर पोलीस अधिक्षक खामगांव, मा. श्री. पियुषजी जगताप, प्रांतीय सचिव एमजेएफ लॉ. जितेंद्र महाजन, प्रांतीय कोषाध्यक्ष एमजेएफ लॉ. मोरेश्वर कुळकर्णी, झोन चेअरपर्सन झोन ४ एमजेएफ मा.लॉ. महेश चांडक व लॉयन्सचे माजी प्रांतपाल तथा अध्यक्ष, धन्वंतरी चॅरीटेबल मेडीकल फाऊंडेशन एमजेएफ लॉ. डॉ. अशोक बावस्कर, लॉयन्सचे सचिव लॉ. श्रमिक जैस्वाल, कोषाध्यक्ष लॉ. सागर गुर्जर व लिओ अध्यक्ष लिओ सागर देशमुख यांची मंचावर उपस्थिती होती.

सरस्वती पूजन, राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व स्व. श्रावण स. बावस्कर गुरुजी यांच्या प्रतिमेस माल्यार्पन, दिप प्रज्वलन, वंदे मातरम् व राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. लॉयन अध्यक्ष लॉ. पिनेश कमाणी यांनी स्वागतपर भाषण केले. प्रकल्प प्रमुख व माजी प्रांतपाल लॉ. डॉ. अशोक बावस्कर यांनी स्व. श्रा.स. बावस्कर गुरुजी स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे स्वरुप, निवड प्रक्रिया, मागील बारा वर्षात वितरित केलेल्या पुरस्काराबाबत माहिती दिली व पुरस्कार प्राप्त सर्व आदर्श शिक्षकांचे अभिनंदन केले व उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

तेराव्या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी प्राथमिक ग्रामीण विभागातून कु. मिनाक्षी शकुंतला नामदेव थोरात, विषय अध्यापिका (जि.प.कें. मराठी उच्च प्राथ. शाळा, अटाळी, ता. खामगांव), प्राथमिक शहरी विभागातून कु. वर्षा कुसुम ज्ञानेश्वर इंगळे, सहा. शिक्षिका (लोकमान्य बाळगंगाधर टिळक न.प. मराठी प्राथ. शाळा क्र ६, खामगांव), माध्यमिक शहरी विभागातून कु. जयश्री रत्नप्रभा महादेव ठेंगझोडे, पदविधर शिक्षिका (जि.प. हायस्कूल (मुले) खामगांव), माध्यमिक ग्रामीण विभागातून श्री. संजय सखुबाई रामचंद्र सावळे, मुख्याध्यापक (श्री. अनंतराव सराफ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेलापूर बु., ता. मोताळा), अंध, अपंग, कर्णबधीर, गतीमंद व आदिवासी विभागातून रोटरी मानव सेवा संस्था, खामगांव व्दारा संचालित रोटरी मतीमंद विद्यालय खामगांव, सेवानृिवत्त विभागातून सेवानिवृत्तीनंतरही सदैव कार्य करणाऱ्या श्री. यादवराव हरणाबाई पाटीलबा सुसर, सेवानिवृत्त शिक्षक (आदर्श मराठा प्राथमिक विद्यामंदिर, चिखली) व वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक विभागातून प्रा.डॉ. धनंजय प्रयागबाई सोपान तळवणकर, प्राचार्य (गो.से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगांव) यांची निवड करण्यात आली आहे. पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षकांना रु. ५००१ रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन मान्यवरांचे हस्ते सपत्नीक शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

सत्कारास उत्तर देतांना पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी त्यांच्या शैक्षणिक व इतर विशेष सेवाकार्याची उपस्थितांना माहिती दिली व त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी झालेल्या फायद्याची योग्य दखल आयोजकांनी घेतल्याबद्दल समाधान व आभार व्यक्त केले. तसेच या पुरस्कारामुळे भावी आयुष्यात अशा प्रकारचे कार्य करत राहण्याची प्रेरणा मिळाल्याचे मनोगत सत्कारार्थी शिक्षक कु. वर्षा इंगळे, कु. जयश्री ठेंगझोडे व संजय सावळे यांनी व्यक्त केले.

या जिल्हास्तरीय पुरस्काराचे मुल्यमापन श्री निनाजी बावस्कर गुरुजी यांच्या सहकार्याने टिळक राष्ट्रीय विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक डॉ. पि.आर. उपर्वट व राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री. के. ओ. बावस्कर, बुलडाणा यांनी केल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे लॉयन्स प्रांत ३२३४ एच२ चे प्रांतपाल पीएमजेएफ लॉ. राहुलजी औसेकर यांनी आपल्या भाषणातून लॉयन्स क्लब खामगांव व धन्वंतरी चॅरीटेबल मेडीकल फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक केले. अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षकांना अधिक चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळते व या उपक्रमाव्दारे संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यातील कान्याकोपऱ्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांची दखल घेऊन त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. अप्पर पोलीस अधिक्षक खामगांव, मा.श्री. पियुषजी जगताप यांनी आपल्या भाषणात शिक्षणाच्या होत असलेल्या व्यावसायीकरणामध्ये नगर परिषद व जि.प. शाळांमधील शिक्षक अतिशय चांगल्या प्रकारे विद्यादानाचे कार्य करुन भारताची नवीन पिढी घडवित असल्याचे सांगितले. तसेच शिक्षकांचा इतर राष्ट्रीय कार्यक्रमातील सहभागाबद्दलही त्यांचे अभिनंदन केले.

स्व. श्रा.स. बावस्कर गुरुजी

ऑक्टोबर सेवा सप्ताह अंतर्गत संपूर्ण प्रांतात होत असलेल्या विविध सेवा कार्याचा शुभारंभ मा. प्रांतपाल लॉ. राहुल औसेकर यांचे हस्ते विधीवत फलकाचे अनावरण करुन संपन्न झाला. सेवा सप्ताहाचे औचित्य साधून लॉयन्स क्लब खामगांवच्या वतीने टिळक राष्ट्रीय विद्यालय खामगांव विद्यार्थी वसतीगृहासाठी भोजन साहित्य राष्ट्रीय शाळा समितीचे अध्यक्ष श्री. सुधाकररावजी अजबे सर व वसतीगृह कार्यवाहक श्री. सुरेश पवार यांना सुपुर्द केले. याप्रसंगी मा. प्रांतपाल, प्रांतीय सचिव व प्रांतीय कोषाध्यक्ष यांनी लॉयन्स आय हॉस्पिटलला भेट देऊन नेत्रशस्त्रक्रिया झालेल्या नेत्ररुग्णांची आस्थेने विचारपूस केली. यावेळी ला अशोक केला यांनी पाहुण्यांना लायन्स आय हॉस्पिटल च्या कार्याची माहिती दिली.

स्व. श्रा.स. बावस्कर गुरुजी

कार्यक्रमाचे संचलन अॅड. अनिल व्यास, आभार प्रदर्शन लॉ. श्रमिक जैस्वाल यांनी केले. लॉ.डॉ. सौ. अपर्णा बावस्कर यांनी पसायदान गायीले व तद्नंतर कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक, त्यांचे कुटुंबीय, पंचशिल होमिओपॅथीक मेडीकल कॉलेजचे अध्यक्ष डॉ. दादासाहेब कविश्वर, टिळक राष्ट्रीय शाळेचे अध्यक्ष श्री. सुधाकररावजी अजबे सर, लॉयन्स ज्ञानपीठचे अध्यक्ष लॉ. अरुण गुप्ता व नॅशनल हायस्कूलचे उप मुख्याध्यापक श्री. हेरंब दिगंबर सर, खामगांव शहरातील गणमान्य व्यक्ती व लॉयन्स तथा लिओ क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती आयोजकांव्दारे लॉयन्स क्लब खामगांवचे अध्यक्ष लॉ. पिनेश कमाणी, सचिव लॉ. श्रमिक जैस्वाल व कोषाध्यक्ष लॉ. सागर गुर्जर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केली आहे.

 

Don`t copy text!