Home Breaking News पांढरी हनवाडीतील हनुमान मंदिरात चोरी; पितळ मूर्तीसह ५० ते ६० हजारांचे साहित्य...

पांढरी हनवाडीतील हनुमान मंदिरात चोरी; पितळ मूर्तीसह ५० ते ६० हजारांचे साहित्य लंपास

 

घंटा, दानपेटी, पितळ दिवे, इन्व्हर्टर-बॅटरीसह अन्य साहित्य चोरट्यांनी नेले; परिसरात खळबळ

 

कुशल भगत | अकोट

 

अकोट तालुक्यातील चोहोट्टा रोडवरील पांढरी हनवाडी येथील हनुमान मंदिरात अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास चोरी केल्याची घटना समोर आली आहे. मंदिरातील पितळेची मूर्ती, घंटा, दानपेटी, पितळेचे दिवे, इन्व्हर्टर-बॅटरी तसेच इतर साहित्य असा अंदाजे ५० ते ६० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे सांगण्यात येत आहे.

 

रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मंदिरात प्रवेश

 

मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी मंदिर परिसरात प्रवेश करून मंदिरातील साहित्याची चोरी केली. सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. धार्मिक स्थळात झालेल्या या चोरीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

 

चोरट्यांनी मंदिरातील पितळेची मूर्ती, घंटा, दानपेटी, पितळेचे दिवे, इन्व्हर्टर-बॅटरी आणि अन्य साहित्य चोरून नेल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. चोरी गेलेल्या साहित्याची किंमत अंदाजे ५० ते ६० हजार रुपये असल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात आले.

 

अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार देणार

 

घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी चोरीच्या या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, अज्ञात चोरट्यांविरोधात पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. पोलिसांनी परिसरातील हालचालींची माहिती घेऊन चोरीचा तपास करावा आणि मंदिरातील साहित्य लंपास करणाऱ्या चोरट्यांचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

 

दरम्यान, या घटनेमुळे पांढरी हनवाडी परिसरात मंदिरांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

Don`t copy text!