Home Breaking News OTT News च्या पुणे विभागीय संपादकपदी मनाली सुमित मोरे

OTT News च्या पुणे विभागीय संपादकपदी मनाली सुमित मोरे

 

मीडिया, डिजिटल मीडिया आणि अँकरिंग क्षेत्रातील अनुभवाचा OTT News ला लाभ

 

पुणे : सोशल मीडिया आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेल्या सात ते आठ वर्षांपासून कार्यरत असलेल्या मनाली सुमित मोरे यांची OTT Newsच्या पुणे विभागीय संपादकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. OTT Newsचे संपादक श्रीधर ढगे पाटील यांनी मनाली सुमित मोरे यांची ही नियुक्ती केली आहे.

 

डिजिटल कंटेंट, सोशल मीडिया, व्हिडिओ एडिटिंग, डिजिटल मार्केटिंग आणि अँकरिंग क्षेत्रातील अनुभव असलेल्या मनाली मोरे आता OTT Newsच्या माध्यमातून पुणे विभागातील पत्रकारिता आणि डिजिटल न्यूज कंटेंटच्या विस्तारासाठी कार्य करणार आहेत.

मनाली सुमित मोरे
मनाली सुमित मोरे

मनाली मोरे यांना सुरुवातीपासूनच अँकरिंग आणि सोशल मीडिया क्षेत्राची विशेष आवड आहे. गेल्या काही वर्षांत त्यांनी YouTube, Instagram, Facebook, X (Twitter), Telegram यांसह विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम केले आहे. कंटेंट क्रिएशनपासून डिजिटल मार्केटिंग आणि व्हिडिओ एडिटिंगपर्यंतच्या विविध कामांचा त्यांना अनुभव आहे.

 

‘Tech Manali’मधून डिजिटल विश्वात स्वतंत्र ओळख

मनाली सुमित मोरे
मनाली सुमित मोरे

टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडिया विषयक कंटेंटसाठी त्यांचे Instagramवरील @techmanali हे प्रोफाइल विशेष ओळखले जाते. या प्रोफाइलला सध्या ६५ हजारांहून अधिक फॉलोअर्स असून, तंत्रज्ञान आणि सोशल मीडिया क्षेत्रातील माहिती त्या सातत्याने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत. Facebookवरही त्यांचा २० हजारांहून अधिक फॉलोअर्सचा प्रेक्षकवर्ग आहे.

 

कॅमेरासमोर प्रभावीपणे संवाद साधणे, विषयाची माहितीपूर्ण मांडणी करणे, डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी कंटेंट तयार करणे तसेच व्हिडिओ एडिटिंग आणि सोशल मीडिया प्रमोशन यामध्येही त्यांनी अनुभव मिळवला आहे.

 

पुणे विभागात OTT Newsच्या डिजिटल विस्ताराची जबाबदारी

 

पुणे विभागीय संपादक म्हणून मनाली मोरे यांच्यावर पुणे विभागातील स्थानिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, महिला, युवा आणि नागरिकांच्या प्रश्नांशी संबंधित बातम्यांना डिजिटल व्यासपीठ देण्याची जबाबदारी राहणार आहे.

 

यासोबतच अँकरिंगच्या माध्यमातून बातम्यांचे प्रभावी सादरीकरण, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर न्यूज कंटेंटचा विस्तार आणि डिजिटल प्रेक्षकांशी थेट संवाद साधण्यावरही भर दिला जाणार आहे.

 

“डिजिटल माध्यमांच्या बदलत्या युगात अनुभवी आणि नव्या पिढीतील डिजिटल पत्रकारांना संधी देत OTT Newsचे नेटवर्क अधिक सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे,” अशी भूमिका संपादक श्रीधर ढगे पाटील यांनी व्यक्त केली.

 

मनाली सुमित मोरे यांच्या नियुक्तीमुळे OTT Newsच्या पुणे विभागातील डिजिटल नेटवर्कला नवी दिशा आणि बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Don`t copy text!