Home Breaking News माजरी शेतशिवारात महिलेस मारहाण ; आरोपीविरुद्ध वेलतुर पोलिसात गुन्हा दाखल

माजरी शेतशिवारात महिलेस मारहाण ; आरोपीविरुद्ध वेलतुर पोलिसात गुन्हा दाखल

माजरी शेतशिवारात महिलेस मारहाण ; आरोपीविरुद्ध वेलतुर पोलिसात गुन्हा दाखल

कुही :- तालुक्यातील माजरी शेतशिवारात शेतातील पिकातून बैलबंडी  नेताना  हटकले असता एका महिलेस तुतारीने मारहाण केल्याची घटना घडली.

 

माजरी शेतशिवारात शेतकरी कमलाबाई मनोहर चवडे ह्या महिलेचे शेत असून  शेतात काम करीत असताना आरोपी हिरामण रामजी हारगुडे याने आपली बैलबंडी कमलाबाईच्या शेतातील पिकातून नेत असताना ‘येथुन बैलबंडी का  नेतो’ असे कमलाबाईने विचारले असता आरोपी हिरामण हारगुडे याने  वेळवाच्या तुतारीने कमलाबाईस मारहाण केली. त्यावरून कमलाबाई चवडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून  वेलतुर पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून वेलतुर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून आरोपी हिरामण रामजी हारगुडे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.  या घटनेचा तपास वेलतुर पोलीस करीत आहेत.

Don`t copy text!