Home Breaking News मुर्तिजापूरच्या पाणीपुरवठ्यासाठी आमदार हरीश पिंपळे मैदानात; काटेपूर्णा, घुंगशी बॅरेजची प्रत्यक्ष पाहणी

मुर्तिजापूरच्या पाणीपुरवठ्यासाठी आमदार हरीश पिंपळे मैदानात; काटेपूर्णा, घुंगशी बॅरेजची प्रत्यक्ष पाहणी

 

 

पाणीसाठा आणि उपलब्धतेचा घेतला आढावा; नागरिकांना नियमित पाणी मिळावे यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा

 

 

श्रीकांत पाचकवडे

अकोला : मुर्तिजापूर शहरातील नागरिकांना नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी आमदार हरीश पिंपळे यांनी काटेपूर्णा बॅरेज आणि घुंगशी बॅरेज येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाणीसाठ्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून उपलब्ध पाणीसाठा, पाणीपुरवठ्याचे नियोजन आणि शहरासाठी आवश्यक असलेल्या पाण्याच्या उपलब्धतेचा आढावा घेतला.

 

सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागू नये, यावर आमदार पिंपळे यांनी भर दिला. शहराची पाण्याची गरज लक्षात घेऊन पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबतही त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

 

पाणीपुरवठ्याच्या नियोजनावर भर

पिण्याचे पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज असून, पाणीटंचाईमुळे शहरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. बॅरेजमधील पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे आणि नागरिकांना नियमित पाणी मिळण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.

 

“मुर्तिजापूर शहरातील नागरिकांना नियमितपणे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे ही प्राथमिकता आहे. पाणीटंचाईमुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजनांसाठी पाठपुरावा करण्यात येईल,” असे आमदार हरीश मारोतीआप्पा पिंपळे यांनी सांगितले.

 

शहरातील पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती, उपलब्ध जलसाठा आणि आगामी काळातील पाण्याची गरज लक्षात घेऊन प्रशासनाकडून प्रभावी नियोजन होणे महत्त्वाचे आहे असल्याचे आमदार हरीश पिंपळे यांनी सांगितले.

Don`t copy text!