Home राजकीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संदीपदादा पाटील यांच्याशी चर्चा; अकोला जिल्ह्यातील पक्षबांधणीवर भर

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संदीपदादा पाटील यांच्याशी चर्चा; अकोला जिल्ह्यातील पक्षबांधणीवर भर

संदीपदादा पाटील
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संदीप पाटील यांच्याशी चर्चा; करून अकोला जिल्ह्यातील पक्षबांधणीवर भर द्यावा असे सांगितले.
श्रीकांत पाचकवडे
अकोला : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अकोला जिल्ह्यातील नेते संदीपदादा पाटील यांनी नुकतीच पक्षाच्या प्रमुख सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत राज्यातील अलीकडील राजकीय घडामोडींसह अकोला जिल्ह्यातील पक्ष संघटन आणि आगामी वाटचालीबाबत सविस्तर चर्चा झाली.
सुनेत्रावहिनी पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार यशस्वी ठरल्याबद्दल संदीपदादा पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच राज्यसभेसाठी निवड झालेले राजेंद्र जैन आणि विधान परिषदेसाठी अविरोध निवड झालेले विक्रम काकडे व अनिकेत तटकरे यांचेही अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी संदीपदादा पाटील यांनी पक्षाच्या यशामागे कार्यकर्त्यांचे अथक परिश्रम, जनतेचा विश्वास आणि नेतृत्वाचे दूरदर्शी धोरण असल्याचे सांगितले. तसेच अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत सुनेत्रावहिनी पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
भेटीदरम्यान सुनेत्रावहिनी पवार यांनी अकोला जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सध्याची स्थिती, कार्यकर्त्यांचा प्रतिसाद, संघटनात्मक बांधणी आणि आगामी राजकीय रणनीती याबाबत संदीपदादा पाटील यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रभावीपणे काम करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्याची माहिती आहे.
Don`t copy text!