Home विदर्भ माना पोलिसांची मोठी कारवाई; MSEB ॲल्युमिनियम तार चोरीची टोळी गजाआड

माना पोलिसांची मोठी कारवाई; MSEB ॲल्युमिनियम तार चोरीची टोळी गजाआड

६ आरोपी अटकेत; ३.०७ लाखांचा मुद्देमाल जप्त — १०१ किलो ॲल्युमिनियम तार व TATA ACE वाहनाचा समावेश

 

श्रीकांत पाचकवडे

अकोला : माना ते जितापूर शेतशिवारातील महावितरणच्या लघुदाब विद्युत वाहिनीवरील ॲल्युमिनियम तार चोरी करणाऱ्या टोळीचा माना पोलिसांनी छडा लावला आहे. या कारवाईत पोलिसांनी सहा आरोपींना अटक करून ३ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी कनिष्ठ अभियंता पवन पातालबंसी यांनी माना ते जितापूर शेतशिवारातील लघुदाब वाहिनीच्या विद्युत खांबावरील सुमारे १ लाख ७ हजार रुपये किमतीची ॲल्युमिनियम तार चोरीला गेल्याची तक्रार दिली होती. त्यावरून माना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

CCTV, तांत्रिक पुरावा नसतानाही तपासाला यश

या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना कोणतेही सीसीटीव्ही फुटेज किंवा तांत्रिक पुरावे उपलब्ध नव्हते. मात्र पारंपरिक तपास पद्धतीचा वापर तसेच गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला.

 

गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेऊन पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

 

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अब्दूल रईस अब्दूल शहीद (४६), भारत श्रीकृष्ण सूर्यवंशी (३३), लखन श्रीकृष्ण सूर्यवंशी (२७), धिरज दिलीप पांडे (२६), रुपराव किसनराव टोपे (५६) सर्व रा. नवीन घरकुल, मूर्तीजापूर, अकोला तसेच शेख आसीम शेख साबीर (२४), रा. सोनोरी, मूर्तीजापूर यांचा समावेश आहे.

 

१०१ किलो तार आणि TATA ACE जप्त

पोलिसांनी आरोपींकडून १०१ किलो ॲल्युमिनियमची तार, अंदाजे किंमत १ लाख ७ हजार रुपये, तसेच गुन्ह्यात वापरलेले TATA ACE वाहन, अंदाजे किंमत २ लाख रुपये, असा एकूण ३ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

भाजपा

दि. १२ सप्टेंबर रोजी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींचा MCR मंजूर केल्यानंतर त्यांची जिल्हा मध्यवर्ती कारागृह, अकोला येथे रवानगी करण्यात आली.

 

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मूळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 

माना पोलीस ठाण्याचे ठाणेदार गणेश नावकार, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप जोगदंड, पोलीस हवालदार सर्वेश कांबे, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर राणे, जावेद खान आणि प्रमोद हिवराळे यांनी तपास व कारवाईत सहभाग घेतला.

Don`t copy text!