Home Breaking News फॅन्सी नंबर प्लेटचा नाद महागात! नेमकं काय घडलं?

फॅन्सी नंबर प्लेटचा नाद महागात! नेमकं काय घडलं?

वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांचा दणका; पुढे चार तर मागे दोन आकड्यांची नंबर प्लेट लावणाऱ्यांवर कारवाई

 

 

श्रीकांत पाचकवडे

अकोला : वाहनाला आकर्षक लूक देण्याच्या नादात नियमांना हरताळ फासणाऱ्या वाहनचालकांविरोधात अकोला वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे. विशेषतः नियमबाह्य आणि फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांची नजर असून, अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील बेशिस्त वाहतुकीविरोधात कारवाईला वेग दिला आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी विविध भागांत तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेत फॅन्सी नंबर प्लेटचा ट्रेंड पोलिसांच्या रडारवर आला आहे. काही वाहनचालकांकडून वाहनाच्या पुढील नंबर प्लेटवर चार आकडे, तर मागील प्लेटवर दोन आकडे अशा पद्धतीने नंबरमध्ये फेरफार केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. नंबर प्लेट स्पष्ट आणि नियमानुसार असणे आवश्यक असताना, आकर्षक दिसण्यासाठी करण्यात येणारे असे बदल वाहतूक नियमांचे उल्लंघन ठरतात.

नंबर प्लेटमध्ये कोणताही मनमानी बदल खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश वाहतूक शाखेने दिला असून, नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईचा धडाका सुरूच राहणार आहे.

फॅन्सी नंबर प्लेटच्या नादात नियम मोडाल, तर पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार!

Don`t copy text!