Home Breaking News जऊळका वस्तीमध्ये गांजाविक्रीचा पर्दाफाश; ३२२ ग्रॅम गांजा जप्त

जऊळका वस्तीमध्ये गांजाविक्रीचा पर्दाफाश; ३२२ ग्रॅम गांजा जप्त

अकोट पोलिसांची कारवाई; ६५ वर्षीय व्यक्तीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा

 

कुशल भगत

अकोट : दहीहांडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जऊळका वस्ती येथे गांजाविक्रीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली. अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत ३२२ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे ४ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले.

पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या ‘प्रहार मोहीमे’अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बळीराम हरीभाऊ भगेवार (६५, रा. जऊळका वस्ती) याच्याविरुद्ध दहीहांडा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१५ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० ते सायंकाळी ५.४५ वाजेदरम्यान पोलिस पथकाने भगेवार यांच्या राहत्या घरी छापा टाकला. तपासणीदरम्यान गांजा आढळून आल्यानंतर पोलिसांनी तो जप्त केला.

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शामकुमार लक्ष्मणराव बुंदेले यांनी फिर्याद दिली. दहीहांडा पोलीस ठाण्यात अप. क्र. ४६५/२०२६ नुसार एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २०(ब)(ii)(ए) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 

गांजा कुठून आला?

 

जप्त केलेला गांजा कोठून आणण्यात आला होता, त्याची विक्री कोणाला केली जात होती आणि या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास दहीहांडा पोलीस करीत आहेत.

अमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका कायम ठेवला असून, जऊळका वस्तीतील या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Don`t copy text!