श्रीकांत पाचकवडे
अकोला : महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी शिवसेना पक्षाने सातत्याने काम केले असून, विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनविण्याचे कार्य केले आहे. मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेसह अनेक योजनांचा लाभ महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिवसेना महिला आघाडी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन शिवसेना जिल्हा विशेष प्रभारी ललितभाऊ वानखडे यांनी केले.
अकोला येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित शिवसेना महिला मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेना महिला आघाडीच्या अकोला जिल्हा संपर्क प्रमुख ॲड. संजना गवळी, विदर्भ प्रवक्ते प्रकाश डवले, शिवसेना महिला सेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेविका उषाताई विरक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. तसेच नवनियुक्त शिवसेना महिला सेना जिल्हाप्रमुख उषाताई विरक यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना ॲड. संजना गवळी यांनी सांगितले की, नामदार एकनाथ शिंदे यांनी महिलांच्या हितासाठी घेतलेले निर्णय आणि शासनाच्या विविध योजना जिल्ह्यातील प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचविण्यासाठी महिला आघाडीने अधिक प्रभावीपणे कार्य केले पाहिजे.
मेळाव्यास शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख उषाताई विरक, देवश्री ठाकरे, विजयाताई राजपूत, निशा अग्रवाल, स्मृती खडतरे, संगीता इंगळे, सपना नवले, वर्षा वसंतराव, अर्चना राऊत, सुरेखा लोखंडे, ज्योती सावरकर, नीता अग्रवाल, प्रतिभा दांगटे, लता सुतार, बबीता गुप्ता, वर्षा गावळी, माधुरी शेगोकार, ॲड. रूपाली जाधव, ॲड. दिपाली जाधव, जयश्री तोरडमल, संगीता सोनोने, राखी पाटेकर, नयबाबेन पटेल, वर्षा सांघवी, मनीषा ग्यारल, स्वानंदी पांडे यांच्यासह महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे आयोजन व समन्वय शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले, अशी माहिती माहिती अनिल मालगे यांनी दिली.





