Home Breaking News नवीन तारफैल हत्याकांडातील मुख्य आरोपी जेरबंद; रामदासपेठ पोलिसांना मोठे यश

नवीन तारफैल हत्याकांडातील मुख्य आरोपी जेरबंद; रामदासपेठ पोलिसांना मोठे यश

रामदासपेठ पोलिस
श्रीकांत पाचकवडे
अकोला : नवीन तारफैल परिसरातील अंकीत नंदागवळी हत्या प्रकरणातील फरार असलेल्या दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात रामदासपेठ पोलिसांना अखेर यश आले आहे. गेल्या चार दिवसांपासून आरोपींचा कसून शोध घेतल्यानंतर पोलिसांनी जळगाव जिल्ह्यातून त्यांना ताब्यात घेऊन अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, १४ जून २०२६ रोजी मध्यरात्री जुन्या वादाचे सेटलमेंट करण्याच्या बहाण्याने अंकीत नंदागवळी याला बोलावून त्याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष शेखर बनसोड (वय ३५, रा. तारफैल, अकोला) आणि आनंद भगवंत चवरे (वय २९, रा. अशोक नगर, अकोट फैल, अकोला) हे घटनेनंतर फरार झाले होते.
या प्रकरणी अंजली स्वप्नील बागडे (वय २६, रा. भीमज्योती चौक, अशोक नगर, अकोट फैल, अकोला) यांच्या फिर्यादीवरून रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४१८/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), ३(५) तसेच इतर संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणातील आरोपी निलेश विजय बोरकर याला अटक केली होती.
रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या मदतीने जळगाव जिल्ह्यातून दोन्ही मुख्य आरोपींना ताब्यात घेत अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालय क्रमांक २ समोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना २१ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी (PCR) सुनावली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रामदासपेठ पोलीस ठाण्याचे ठाणेदार शिरीष खंडारे यांच्या नेतृत्वात पोउपनि निलेश गायकवाड, प्रदीप जोगदंड, श्याम मोहळे, दादाराव टापरे, सुरेश लांडे, संदीप वानखडे, किरण गवई, प्रेम नांदोकार, अनिल धनभर, इमाम चौधरी, रोशन पटले, अभिजित इंगळे तसेच महिला पोलीस कर्मचारी माधुरी लाहोळे, कावेरी ठाकणे आणि प्रियंका बागडे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
Don`t copy text!