Home Breaking News पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते श्री बाराभाई गणपतीची महाआरती 

पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते श्री बाराभाई गणपतीची महाआरती 

 

श्रीकांत पाचकवडे

अकोला : अकोला शहरातील मानाच्या श्री बाराभाई गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते श्री बाराभाई गणपतीचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते श्रीगणेशाची महाआरतीही करण्यात आली.

 

यावेळी खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार साजिद खान पठाण, महापौर शारदा खेडकर, माजी आमदार अमोल मिटकरी, बबनराव चौधरी यांच्यासह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी एडवोकेट मोतीसिंग मोहता, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश तायडे, जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, भाजप नेते रणजित खेडकर यांच्यासह कार्यकर्ते आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

श्री बाराभाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली असून, गणरायाच्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला. विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन व पोलिसांकडून आवश्यक बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली आहे.

Don`t copy text!