Home Breaking News भर दिवसा आठवडी बाजारातून मोटरसायकल लंपास ; तालुक्यात 15 दिवसात दुचाकी चोरीची...

भर दिवसा आठवडी बाजारातून मोटरसायकल लंपास ; तालुक्यात 15 दिवसात दुचाकी चोरीची दुसरी घटना

भर दिवसा आठवडी बाजारातून मोटरसायकल लंपास ;  15 दिवसात दुचाकी चोरीची दुसरी घटना

कुही:- बुधवारी कुही येथील आठवडी बाजारात भाजीपाला घेण्यास आलेल्या व्यक्तीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. फिर्यादी दुचाकीमालक यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरांविरुद्ध कुही पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंधरा दिवसांपूर्वी कुही शहरातील मुख्य मार्गावरून दुचाकी चोरीला गेल्याची घटना ताजी असताना बुधवारी कुहीच्या आठवडी बाजारातून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी पळविल्याची माहिती आहे. फिर्यादी मनोज शंकर मस्के (वय 40) रा. कुही हे बुधवार बाजारात (दि. 28 ऑगस्ट)   सायंकाळी 4:30 च्या सुमारास कुही शहरातील गणेश मंदिर परिसरात त्यांची एमएच 40 एपी 2563 क्रमांकाची दुचाकी लॉक करून बाजारात भाजीपाला घ्यायला गेले होते. व अर्ध्या तासात भाजीपाला घेऊन परत आले असता गाडी पार्क केलेल्या ठिकाणी त्यांना त्यांची दुचाकी दिसून आली नाही. मस्के यांनी आजूबाजूच्या परिसरात त शोध घेतला मात्र कुठेही दुचाकी दिसून न आल्याने गाडी चोरी गेल्याची समजले. फिर्यादी मनोज शंकर मस्के यांच्या तक्रारीवरून अज्ञात दुचाकी चोराविरोधात कुही पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा पुढील तपास ठाणेदार भानुदास पिदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुही पोलीस करत आहेत.

Don`t copy text!