Home Breaking News अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीतांविरूध्द कारवाई ; वेलतुर पोलीसांची कामगिरी

अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीतांविरूध्द कारवाई ; वेलतुर पोलीसांची कामगिरी

अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीतांविरूध्द कारवाई ; वेलतुर पोलीसांची कामगिरी

कुही :- पोलीस स्टेशन वेलतूर हद्दीत येणाऱ्या वेळगाव ते गोठणगाव मार्गावरून  अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करून आरोपीतांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी  दि.२७/०४/२०२५ रोजी वेलतुर पोलीस हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना वेलतूर पोलीसांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, मौजा वेळगाव कडुन गोठणगाव कडे येणाऱ्या डांबरी रोडनी अवैधरित्या विनापरवाना रेतीची चोरटी वाहतुक होत आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीसांनी वेळगाव शिवारात रोडवर नाकाबंदी केली असता एक १२ चक्का ट्रक क्र. एम.एच.४९ ऐ.टी. ९४७१ हे वाहन मिळुन आले. वाहन थांबवुन पंचासमक्ष वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये रेती आढळुन आली. वाहन चालक आरोपी नामे सुरज भैय्याजी राऊत, (वय २५ वर्षे), रा. वाकरला ,पोस्ट-आंबोली,ता. चिमुर जि. चंद्रपुर याला परवान्याबाबत विचारपुस केली असता त्याच्या कडे ३ ब्रास रेती वाहतुकीचा परवाना होता परंतु वाहनामध्ये पारवान्यापेक्षा ६ ब्रास जास्त रेती होती.

पोलीसांनी पंचासमक्ष १)९ ब्रास रेती आणि २) ट्रक क्र. एम.एच.४९ ऐ.टी. ९४७१ रूपयाचा मुददेमाल जप्त केला आहे. असा एकुण ३०,४५,०००/- नमुद वाहन चालकाविरूध्द पोलीस स्टेशन वेलतुर येथे कलम ३०३(२) भा.न्या.सं सहकलम ४८(७), ४८(८) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सह कलम ४,२१ खाण खनिज अधिनियम,कलम ०३ सार्व. संपत्ती नुकसान प्रतिबंध अधि. अन्वये गुन्हा नोंद दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई ही वेलतूरचे ठाणेदार प्रशांत मिसाळे यांच्या मार्गदर्शनात वेलतूर पोलिसांनी केली आहे.

Don`t copy text!