Home Breaking News प्रेयसीने बोलणं बंद केलं म्हणून तरुणाने घरी जाऊन केली वाहनांची जाळपोळ

प्रेयसीने बोलणं बंद केलं म्हणून तरुणाने घरी जाऊन केली वाहनांची जाळपोळ

प्रेयसीने बोलणं बंद केलं म्हणून तरुणाने घरी जाऊन केली वाहनांची जाळपोळ

नागपूर : प्रेयसीने बोलणे बंद केल्याने प्रियकराने तिचा घरी गोंधळ घालून वाहनांची जाळपोळ केली. ही थरारक घटना कपीलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पोलिसांनी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला. स्नेहल सुनील अंबादे (वय २२,रा. कपिलनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव असून तो पेंटिंगचे काम करतो.

स्नेहलचे गेल्या तीन वर्षांपासून अनामिका (वय २२, नाव बदललेले) हिच्यासोबत प्रेमसंबंध आहेत. त्यांच्या प्रेमाबाबत अनामिकाचा भाऊ अभिषेक याला माहिती मिळाली. त्याने आई-वडिलांना सांगितले. त्यामुळे अनामिकाने स्नेहलसोबत बोलणे आणि भेटणे बंद केले. अनामिका घरीच राहायची. अनामिका भेटत नसल्याने स्नेहल संतापला. तो तिला भेटण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र त्याला अपयश आले. स्नेहल अंबादे मध्यरात्री अनामिकाच्या पहिल्या माळ्यावरील खोलीजवळ गेला. यावेळी अनामिका ही खोलीत होती. त्याने दरवाजा ठोठावला. अनामिकाने दरवाजा उघडला नाही.

तो गोंधळ घालून शिवीगाळ करायला लागला. याचदरम्यान त्याने घरासमोरील तीन मोपेड जाळल्या. आग पाहून शेजारी जमले. त्यांनी अनामिकाचा भाऊ अभिषेकला आवाज दिला. अभिषेकने दरवाजा उघडला असता वाहने जळताना दिसली. पाणी टाकून अभिषेक आणि शेजाऱ्यांनी आग विझवली. दरम्यान, स्नेहल पसार झाला. अभिषेकने कपिलनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Don`t copy text!