Home Breaking News रोजगार हमी योजनेच्या कामात लाखो रुपयांचा घोळ

रोजगार हमी योजनेच्या कामात लाखो रुपयांचा घोळ

रोजगार हमी
श्रीकांत पाचकवडे
अकोला : अकोला पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कानशिवनी ग्रामपंचायत मध्ये जन सुविधा रोजगार हमी योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राजू वाहूरवाघ यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पंचायत समितीच्या बीडीओंकडे केली आहे.
पंधरावा वित्त आयोगांतर्गत करण्यात आलेल्या रस्ते आणि नाली बांधकामात मोठ्या प्रमाणात अपहार झाला आहे. तसेच रोजगार हमी योजनेच्या कामात पंचायत समिती मधील अधिकाऱ्यांच्या संगनमताने लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून वृक्ष लागवड फळबाग योजनेत कागदपत्रे वृक्ष लागवड करून लाखो रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याची तक्रार राजू गौरव वाघ यांनी केली आहे.
Don`t copy text!