Home Breaking News अकोला जिल्ह्यातील रस्ते-पुलांच्या विकासासाठी भरीव निधी द्या! आ. हरीश पिंपळे यांची...

अकोला जिल्ह्यातील रस्ते-पुलांच्या विकासासाठी भरीव निधी द्या! आ. हरीश पिंपळे यांची सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे मागणी

श्रीकांत पाचकवडे

अकोला : अकोला जिल्ह्यातील रस्ते, पूल आणि रखडलेल्या विकासकामांना गती देण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ आमदार हरीश पिंपळे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे केली.

 

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बैठकीत अमरावती विभागातील विविध प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी आ. पिंपळे यांनी आपल्या अकोला जिल्ह्यातील रस्ते व पुलांची प्रलंबित कामे, नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि आवश्यक विकासकामे याबाबतची माहिती मंत्र्यांसमोर मांडली.

 

प्रलंबित कामांना प्रशासकीय मंजुरी व निधी उपलब्ध करून देत तातडीने कामे मार्गी लावावीत, अशी मागणी त्यांनी केली. रस्ते आणि पुलांची कामे वेळेत पूर्ण झाल्यास नागरिकांची वाहतूक अधिक सुलभ होण्यासोबतच परिसराच्या विकासालाही चालना मिळणार असल्याचे आमदार हरीश पिंपळे यांनी सांगितले.

या बैठकीला आमदार सुलभाताई खोडके, प्रकाशभाऊ भारसाकळे, प्रवीणभाऊ तरटे, प्रवीणभाऊ तायडे, राजेशभाऊ वानखेडे, किसनभाऊ वानखेडे, विधान परिषद आमदार संजयभाऊ खोडके, प्रवीणभाऊ पोटे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता सुषमा चिंतामणी बोंद्रे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Don`t copy text!