श्रीकांत पाचकवडे
अकोला : अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील जऊळखेड येथील झगेश्वर संस्थानच्या विकासासाठी पर्यटन-तीर्थक्षेत्र निधीतून ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करून उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार रणधीरभाऊ सावरकर यांचा संस्थान व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.
धार्मिक स्थळाच्या विकासाला बळ
झगेश्वर संस्थानला निधी मिळाल्यामुळे परिसराच्या विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांच्या विकासासाठी स्थानिक गरजा लक्षात घेऊन निधी उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांचे ग्रामस्थांनी स्वागत केले.

यावेळी संस्थानचे अध्यक्ष विजय पाटील दोड, अंबादास दोड, नंदकिशोर ढोरे, ज्ञानेश्वर दोड, राजेंद्र दोड, अंकुश हिंगणकर, अक्षय दोड, दिनेश जऊळकार, मनोहर मानकर, नंदू दोड, कवीश्वर निपाणे, बूथ प्रमुख वसंत दोड, बूथ प्रमुख सचिन पुरी आदी उपस्थित होते.
धर्म, संस्कृतीसोबत विकासकामांवर भर
गावाची गरज, धार्मिक-सांस्कृतिक परंपरा तसेच परिसराचे सामाजिक व ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन आमदार सावरकर विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा करीत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. धार्मिक स्थळांचा विकास आणि स्थानिक विकासकामांना प्राधान्य देत जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून सुरू असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.






