Home Health रामदासपेठेतील राज्य कामगार विमा सेवा दवाखान्यात ‘सेवा संकल्प अभियान’

रामदासपेठेतील राज्य कामगार विमा सेवा दवाखान्यात ‘सेवा संकल्प अभियान’

Akola

१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आरोग्य तपासणीसह विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन

 

श्रीकांत पाचकवडे

अकोला : महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्य कामगार विमा योजना आयुक्तालयाच्या आदेशानुसार रामदासपेठ येथील राज्य कामगार विमा योजना सेवा दवाखाना, अकोला क्रमांक १ येथे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे.

 

या अभियानाचा मुख्य उद्देश विमेदार, त्यांचे कुटुंबीय आणि रुग्णांना आरोग्यविषयक सेवा व मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, तसेच विविध आजारांबाबत जनजागृती करणे हा आहे. अभियानादरम्यान आरोग्य तपासणी, उपचार आणि आजारांपासून बचावासाठी घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

 

विविध उपक्रमांतून जनजागृती

सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून आरोग्यासोबतच सामाजिक बांधिलकीचे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये—

🌱 वृक्षारोपण अभियान

 

🩸 रक्तदान व अवयवदान जनजागृती

 

🏥 आरोग्य तपासणी शिबिर

 

🧘 योग व ध्यान शिबिर

 

🧹 स्वच्छता अभियान

 

🚭 व्यसनमुक्ती भारत जनजागृती

 

👩 महिलांचे आरोग्य व स्वच्छतेबाबत मार्गदर्शन

 

🥗 पोषण व रक्ताल्पता जनजागृती

 

👶 बालरोग तपासणी शिबिर

 

अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

आरोग्यसेवा, जनजागृती आणि सामाजिक सहभाग यांचा संगम साधत ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वी करण्याचा प्रयत्न राज्य कामगार विमा योजना सेवा दवाखाना अकोला क्रमांक १ यांच्याकडून करण्यात येणार आहे.

Don`t copy text!