Home विदर्भ बाळापूर शहरात पोलिसांचा शिस्तबद्ध ‘रूट मार्च’; सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेचा कडक संदेश

बाळापूर शहरात पोलिसांचा शिस्तबद्ध ‘रूट मार्च’; सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेचा कडक संदेश

राजेश पल्हाडे

बाळापूर : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी बाळापूर पोलिसांनी शनिवारी (१९ सप्टेंबर) सायंकाळी शहरातून शिस्तबद्ध ‘रूट मार्च’ काढत पोलिसांची सज्जता दाखवून दिली. या रूट मार्चच्या माध्यमातून नागरिकांना शांतता, सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था कायम ठेवण्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला.

 

उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाळापूर टाऊन परिसरात हा रूट मार्च काढण्यात आला. बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे यांच्यासह ५ पोलीस अधिकारी व २६ पोलीस कर्मचारी यात सहभागी झाले होते.

सुरक्षेच्या दृष्टीने राज्य राखीव पोलीस बलाचे (SRPF) १२ कर्मचारी, आरसीपीचे २१ कर्मचारी, आरपीसीचे १० पुरुष व ५ महिला कर्मचारी तसेच ३४ होमगार्ड जवान मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले होते.

सायंकाळी ५.४० वाजता जुने पोलीस स्टेशन, बाळापूर येथून रूट मार्चला सुरुवात झाली. त्यानंतर जयस्तंभ चौक, बडीशेही मस्जिद, छोटीशी मस्जिद, अंजुमन रोड, जुनी चावडी चौक, जैन मंदिर, बुलबुली चौक आणि बस स्टँड या प्रमुख मार्गांवरून पोलिसांचे पथक मार्गक्रमण करत गेले. सायंकाळी ६.१५ वाजता जुने पोलीस स्टेशन येथे रूट मार्चची सांगता करण्यात आली.

आगामी सण-उत्सव शांततेत पार पडावेत, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी आणि कोणत्याही अनुचित प्रकाराला आळा बसावा, या उद्देशाने पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान, शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Don`t copy text!