Home Breaking News अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी तिसऱ्या दिवशी श्रीकांत देशपांडे यांनी केला अर्ज दाखल

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी तिसऱ्या दिवशी श्रीकांत देशपांडे यांनी केला अर्ज दाखल

 

आज ११ उमेदवारांसाठी २१ नामनिर्देशनपत्रांची उचल; उद्या गांधी जयंतीमुळे अर्जप्रक्रियेला सुटी

 

 

श्रीकांत पाचकवडे 

अकोला : विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन प्रक्रिया सुरू असून, तिसऱ्या दिवशी गुरुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत दोन उमेदवारांनी एकूण तीन नामनिर्देशनपत्रे दाखल केली.

 

निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात श्रीकांत गोविंद देशपांडे (अपक्ष + शिवसेना) आणि किरण अर्जुन चौधरी (अपक्ष) यांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.

 

दरम्यान, गुरुवारी ११ उमेदवारांसाठी एकूण २१ नामनिर्देशनपत्रांची उचल करण्यात आली. त्यामुळे आगामी काळात अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

 

गांधी जयंतीमुळे उद्या अर्जप्रक्रियेला सुटी

 

शुक्रवार, २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त सार्वजनिक शासकीय सुटी असल्याने अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली किंवा वितरित केली जाणार नाहीत. त्यामुळे पुढील नामनिर्देशन प्रक्रिया सुटीनंतर पुन्हा सुरू होणार आहे.

Don`t copy text!