Home Breaking News ऑपरेशन प्रहारचा दणका! गावठी कट्टा, जिवंत काडतुसे अन् धारदार चाकूसह तिघे जेरबंद

ऑपरेशन प्रहारचा दणका! गावठी कट्टा, जिवंत काडतुसे अन् धारदार चाकूसह तिघे जेरबंद

 

कानशिवनी येथे एलसीबीची धडक कारवाई; ४९ हजारांचा मुद्देमाल जप्त, कटाचा डाव उधळल्याचा पोलिसांचा दावा

 

 

श्रीकांत पाचकवडे

अकोला : अकोला जिल्ह्यात अवैध शस्त्रांविरोधात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले. गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे, धारदार चाकू, दोन मोबाईल आणि इतर साहित्य असा एकूण ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

 

पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांनी पथक तयार करून कारवाईचे निर्देश दिले.

 

गुप्त माहिती अन् थेट सापळा

 

३० सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अकोला परिसरात पेट्रोलिंग करीत असताना, कानशिवनी गावातील गोरक्षणजवळ काही जण देशी कट्टा व चाकू घेऊन फिरत असून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

 

माहितीची खात्री करून पथकाने गोरक्षण परिसरात सापळा रचला. पंचांसमक्ष तिघांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याकडून शस्त्रे व इतर साहित्य आढळून आले.

 

कोणाकडून काय जप्त?

 

विजय अंबादास पवार (२६), रा. खांबोरा, ता. बार्शीटाकळी — देशी बनावटीचा कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे.

 

संदीप श्रीराम वाहुराध (३६), रा. कानशिवनी — लोखंडी धारदार चाकू.

 

सहील उर्फ वैभव देवानंद गांवडे (२०), रा. खांबोरा — कारवाईदरम्यान ताब्यात.

 

तिघांकडून दोन मोबाईलसह एकूण ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न?

 

पोलिसांच्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या आरोपींची चौकशी करण्यात आली असून शस्त्रे बाळगण्यामागील उद्देशाबाबत तपास सुरू आहे. पोलिसांनी या कारवाईतून संभाव्य गुन्हेगारी कट उधळल्याचे सांगितले आहे.

 

याप्रकरणी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात कलम ६१(२), ३(५) बीएनएस तसेच कलम ३, २५ आर्म्स ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

 

एलसीबीच्या पथकाची धडक कामगिरी

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी स्था.गु.शा. येथील अधिकारी निलेश देशमुख, गोपाल जाधव, विष्णु बोडखे, माजीद पठाण, अनिल चव्हाण व पोलीस अंमलदार शेख हसन, उमेश पराये, सुलतान पठाण, फिरोज खान, भास्कर धोत्रे, अमीत दुबे, अब्दुल माजिद, रविंद्र खंडारे, महेंद्र मलिये, किशोर सोनोने, खुशाल नेमाडे, मंगेश इंगळे, वसीमोद्दीन, एजाज अहमद, राहुल गायकवाड, खप्नील खेडकर, श्रीकांत पातोंड, अन्सार अहमद, राज चंदेल, आकाश मानकर, धिरज वानखडे, पवन डांबलकर, अभिषेक पाठक, मोहम्मद आमीर, सतिश पवार, अशोक सोनवणे, भिमराव दिपके तसेच चालक विनोद ठाकरे, प्रविण कश्यप, रामकिसन डोईफोडे, मनिष ठाकरे, देवानंद खरात, प्रकाश लोखंडे यांनी केली आहे.

Don`t copy text!