Home Breaking News “माझ्या बळीराजाला सुखी कर!” आमदार हरीश पिंपळे यांचे महालक्ष्मी मातेला साकडे

“माझ्या बळीराजाला सुखी कर!” आमदार हरीश पिंपळे यांचे महालक्ष्मी मातेला साकडे

श्रीकांत पाचकवडे

अकोला : नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वानिमित्त मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीशभाऊ मारोतीआप्पा पिंपळे यांनी मुंबई येथील श्री महालक्ष्मी माता मंदिरात दर्शन घेऊन देवीच्या चरणी नतमस्तक होत शेतकरी बांधवांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

‘माझ्या बळीराजाला सुखी कर, शेतकऱ्यांना मुबलक पाऊस आणि पाणी मिळू दे, शेती बहरू दे आणि महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् होऊ दे,’ असे साकडे आमदार पिंपळे यांनी आई महालक्ष्मीच्या चरणी घातले.

 

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात सुखाचे दिवस यावेत, त्यांच्या कष्टाला योग्य फळ मिळावे आणि राज्यात सर्वत्र समृद्धी नांदावी, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

 

या दर्शनप्रसंगी त्यांचे मित्र गोपाल दायमा उपस्थित होते.

 

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना, हा आमदार हरीश पिंपळे यांच्या या धार्मिक भेटीचा मुख्य संदेश ठरला.

Don`t copy text!