Home Breaking News दिवाळीपूर्वी अंगणवाडी सेविका-मदतनीसांना दोन हजारांची भाऊबीज भेट!

दिवाळीपूर्वी अंगणवाडी सेविका-मदतनीसांना दोन हजारांची भाऊबीज भेट!

 

२ लाख १४ हजार ९७ कर्मचाऱ्यांसाठी ४२ कोटी ८१ लाखांचा निधी उपलब्ध

 

श्रीकांत पाचकवडे

अकोला : राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची दिवाळी गोड होणार आहे. दिवाळीपूर्वी भाऊबीज भेट म्हणून प्रत्येक सेविका व मदतनीसाला प्रत्येकी २ हजार रुपये देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

 

राज्यातील एकूण २ लाख १४ हजार ९७ अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी ४२ कोटी ८१ लाख ९४ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

 

पोषणसेवेतील योगदानाची दखल

 

गर्भवती महिला, स्तनदा माता आणि बालकांच्या पोषण व आरोग्याशी संबंधित योजनांची अंमलबजावणी करण्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या कार्याची दखल घेत दिवाळीच्या सणानिमित्त आर्थिक भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

 

ठळक मुद्दे

 

प्रत्येक अंगणवाडी सेविका व मदतनीसाला २,००० रुपये.

 

राज्यातील २,१४,०९७ कर्मचाऱ्यांना लाभ.

 

एकूण ४२ कोटी ८१ लाख ९४ हजार रुपयांचा निधी.

 

दिवाळीपूर्वी भाऊबीज भेट देण्याची घोषणा.

Don`t copy text!